पंतप्रधान मोदी-खा. राजेनिंबाळकर यांच्यात धाराशिवच्या विकासावर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे शिवसेना पक्षाच्या खासदारांसाठी आयोजित केलेल्या अल्पोपहार बैठकीस खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर उपस्थित होते.
Dharashiv News
पंतप्रधान मोदी-खा. राजेनिंबाळकर यांच्यात धाराशिवच्या विकासावर चर्चाfile photo
Published on
Updated on

Prime Minister Modi and MP Rajenimbalkar discuss the development of Dharashiv

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे शिवसेना पक्षाच्या खासदारांसाठी आयोजित केलेल्या अल्पोपहार बैठकीस खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर उपस्थित होते. या बैठकीत धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामे, प्रलंबित प्रश्न आणि आगामी विकास आराखड्याबाबत पंतप्रधानांशी चर्चा केली, अशी माहिती राजेनिंबाळकर यांनी दिली.

Dharashiv News
Omprakash Rajenimbalkar : कृष्णा-मराठवाडा प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा द्या

खा. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाचे सहकार्य मिळावे, याबाबत बैठकीत सकारात्मक संवाद झाला. धाराशिवमधील पायाभूत सुविधा, आणि विकासकामे नागरिकांच्या प्रश्नांना गती देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या समन्वयातून प्रयत्न करण्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना आपापल्या मतदारसंघातील विकासकामांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले.

केंद्र आणि राज्य शासनाच्या समन्वयातून उपलब्ध संधींचा प्रभावी वापर करून विकासकामे वेगाने पूर्ण करावीत. तसेच कोणतीही अडचण निर्माण झाल्यास पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधून प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी दिले. बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी खा. राजेनिंबाळकर यांच्या नियमित योगाभ्यासाची आपुलकीने विचारपूस केली.

Dharashiv News
'भोंगा वाजला... टीव्ही-मोबाईल बंद !'

या भेटीमुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विकासकामांना केंद्र शासनाच्या सहकार्याने अधिक गती मिळेल, असा विश्वास खा. राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केला. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news