

Preferred fertilizers and seeds ran out sowing
ईट, पुढारी वृत्तसेवा:
परिसारात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकरी वर्गाकडून पेरणी तयारी सुरू केली आहे. ६ जूनपर्यंत ईट मंडळामध्ये २०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे पेरणी स्थिती निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांकडून खत व बी बियाणे खरेदीसाठी कृषी सेवा दुकानामध्ये गर्दी केल्याचे चित्र असले तरी शेतकऱ्यांना हवे असलेले डीएपी व ईतर खते, निर्मलचे उडीद बियाणे गायब झाली आहेत. काही दुकानात ते उपलब्ध आहे मात्र ते किमतीवर दिले जात आहे. जे दुकानामध्ये उपलब्ध आहेत तीच खते घेण्याची विनंती दुकानदारकडून केली जात आहे.
यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच शेतकऱ्यांनी कृषी दुकानमध्ये जो खत साठा उपलब्ध आहे त्यातील कोणतेही खते खरेदी करून पेरणी करण्याचे आवाहन संबंधित कृषी विभागाकडून केले जात आहे.
ईटसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगल्या प्रकारे हजेरी लावली आहे. या झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यामुळे पेरणीची लगबग सुरू झाली आहे. खत, बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्राच्या दुकानामध्ये गर्दी होताना दिसून येत आहे. मात्र शेतकऱ्यांना पेरणीसाठी अवश्यक असणारी कंपनीची खते गायब झाली आहेत. पेरणी सुरू झाली नाही तोपर्यंत खताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याकडे संबधित कृषी विभागाचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
शेतकऱ्यांना पेरणीसाठी हवे असलेली डीएपी (१८४६),१०.२६.२६,१२.३२.१६ आधी अवश्यक असणारी ही खते दुकानामध्ये मिळत नाहीत. उलट दूसरे खत घेऊन जाण्याचा आग्रह दुकानदारांकडून केला जात आहे. तसेच सोयाबीन बॅग घेत असाल तरच तुम्हाला खत मिळले अशी सक्ती होत आहे.
शेतकऱ्यांना हवे असणाऱ्या कंपनीचे उडीद बियाणे गायब झाले आहे. त्या बियाणेसाठी शेतकऱ्यांना पळापळ करावी लागत आहे. मात्र काही ठिकाणी हे बियाणे मिळत आहे; मात्र त्या बियाणेच्या दरामध्ये तफावत असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणच्या कृषी दुकानात हे बियाणे १ हजार ८०० रुपये ना दिले जात आहे तर काही दुकानात हेच बियाणे १ हजार ९५० रुपये ना दिले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.