

Pawanraje Nimbalkar Case: धाराशिवमधीलच नाही तर संपूर्ण राज्यातील सर्वात चर्चित राजकीय खून प्रकरण म्हणजे पवराजे निंबाळकर खून प्रकरण म्हणून ओळखलं जातं. तब्बल २० वर्षानंतर आज या प्रकरणी न्याय मिळणार अशी अशा पल्लवित झाली. मात्र या प्रकरणात सीबीआय विशेष न्यायालयानं सर्व ९ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुराव्या अभावी ही निर्दोष मुक्तता करण्यात आली.
हल्ल्यात वापरलेल्या गाडीचे तपशील जुळत नाहीत. मयत व्यक्तीचे सीडीआर आणि इतरांचे सीडीआर जुळत नाहीत. माफीच्या साक्षीदाराच्या जबानीतही प्रचंड तफावत आहे असं स्पष्ट करत सत्र न्यायालायने माजी गृहराज्यमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह ९ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
या प्रकरणाचा निकाल १६ जून रोजी लागणार होता. मात्र ऐनवेळी कोर्टाने राखून ठेवलेल्या निकाल देण्याची तारीख पुढे ढकलली. आज २० जून रोजी या प्रकरणी निकाल सुनावणी होणार आहे. या प्रकरणात जामीनावर बाहेर असलेल्या तत्कालीन गृहराज्यमंत्री पद्मसिंह पाटील यांच्या भवितव्याचा देखील निकाल लागणार आहे. ते पवनराजे निंबाळकरांचे चुलत बंधू आहेत. या प्रकरणात ते प्रमुख आरोपी आहेत. याचबरोबर एकूण ९ आरोपी असून ते देखील आज निकाल जाहीर करताना सीबीआय विशेष कोर्टात हजर होते.
लोकनेत्याची हत्या होणं ही दुर्दैवी घटना
जवळपास २० वर्षांनी निकाल देत आहे
सीबीआयकडे तपास आल्यानंतर प्रकरणाला गती मिळाली
विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय वैमन्यस्यातून हत्या झाल्याचे सीबीआयचे म्हणणे
२००३ मध्ये पवनराजेंनी एसपींकडे सुरक्षा मागितली होती.
सरकारी वकिलांनी त्यांची जबाबदारी पाळली नाही. त्यांच्या चुकीमुळं आम्ही चांगला पुरावा गमावला.
या निकालाची भिस्त ही माफीच्या साक्षीदार याच्यावर होती.
कबुली जबाब तपासताना साक्षीदारांची मानसिक अवस्था तपासली.
माफीच्या साक्षीदारांमध्ये जबाबात खूप विसंगती.
सीबीआयचा पुरावा गंमतीशीर आहे. पत्र कुणी आणून दिलं हे मात्र कोण सांगत नाही.
माफीचा साक्षीदार हा जिवे मारल्याची धमकी दिल्याचं सांगतोय.
१२७ साक्षीदार तपासले, क्रमांक ४ चा साक्षीदार माफीचा साक्षीदार झाला.
माफीचा साक्षीदार कुठेही पलटतो.
आरोपींचे सीडीआर देखील काढले नाहीत, मोबईल जप्त केले असते तर मोठी माहिती मिळाली असती.
माफीच्या साक्षीदारांवर टिकून राहणं पुरेसं ठरणार नाही.
इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमध्ये आरोपी राहिला याचा पुरावा नाही.
माफीच्या साक्षीदाराकडे मोठी संपत्ती.
माफीच्या साक्षीदाराने तीन जबाबात तीन स्टोरी सांगितल्या.
माफीच्या साक्षीदाराने पिंटू सिंहला सुपारी दिली होती.
दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे सहा आमदार फुटून शिंदे गाटात सामील झाले. त्यातील एक नाव म्हणजे ओमराजे निंबाळकर...
आमोराजे निंबाळकर यांना फोडता यावं यासाठीच सुनावणी पुढं ढकलण्यात आला असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यांनी ओमराजे आमच्या पक्षात या आम्ही तुमच्या बाजूने निकाल लावतो असं डील झाल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळं आजच्या या निकालाकडं संपूर्ण राज्याचं बारीक लक्ष आहे.
या प्रकरणामध्ये आरोपी म्हणून पद्मसिंह पाटील, शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग, छोटू पांडे, माजी नगरसेवक मोहन शुक्ला, बसपा नेता कैलास यादव, शशीकांत कुलकर्णी, सतीश मंदाडे आणि पारसमल जैन यांचा समावेश आहे.
03 जून 2006 रोजी मुंबईहून उस्मानाबादकडे जात असताना नवी मुंबईतील कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर यांच्यावर गोळीबार
चालक समद काझी यांचाही मृत्यू
दोन अज्ञात हल्लेखोरांनी केला होता पाठलाग करून हल्ला
राजकीय वैरातून 35 लाखांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा CBI चा दावा
2009 मध्ये CBI कडून पद्मसिंह पाटील अटक
पद्मसिंह पाटील सप्टेंबर 2009 पासून जामिनावर बाहेर, तब्येतीच्या कारणास्तव मिळाला होता जामीन