Mysterious Sound : प्रशासन म्हणते.. भूकंप नाही! ठीकय.... मग आवाज कशाचा ?

धाराशिव : सलग दुसऱ्या दिवशीही गूढ आवाज
Mysterious Noise |
Mysterious Sound : प्रशासन म्हणते.. भूकंप नाही! ठीकय.... मग आवाज कशाचा ?File Photo
Published on
Updated on

Mysterious Sound: The administration says... it's not an earthquake! Okay... then what caused the sound?

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा :

शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गुरुवारीही (दि. ५) दुपारच्या सुमारास गूढ आवाज झाले. या गूढ आवाजाचे प्रभावक्षेत्र धाराशिव, कळंज, धूम, वाशी तालुका असे राहिले. बुधवारीही असेच आवाज इवल्याने अनेक घरांच्या भीती थरथरल्या होत्या. यावर प्रशासनाने हा आवाज भूकंपाचे नसल्याचे सांगून नागरिकांना अफसांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले होते. प्रत्यक्षात हा आवाज कशाचा आहे. याचे उत्तर मात्र प्रशासन देऊ शकलेले नाही.

Mysterious Noise |
Tanaji Sawant inquiry threat: थांब तुझी चौकशीच लावतो... तानाजी सावंतांनी बंडखोर उमेदवारालाच धरला दम, Video होतोय व्हायरल

बुधवारी सकाळी दोन केळा गूड आणि प्रचंड आवाज झाल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. या आवाजामुळे अनेक घरांच्या खिडक्या हादरल्या, तर काही ठिकाणी घरातील भांडीही भरवरली होती. अचानक झालेल्या या घटनेमुळे अनेकांना १९९३ च्या भूकंपाची आठवण झाली होती.

सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी दुपारी तीन वाजून नऊ मिनिटांनी तसेच पुन्हा अवघ्या तीन मिनिटांनी दोन वेळा गूढ आवाज झाले. या आवाजानंतर नागरिकांनी एकमेकांना फोन करून आबाज झाल्याची खात्री केली.

Mysterious Noise |
Mysterious Sound : पुन्हा गूढ आवाजाने भिंती थरथरल्या, नागरिकांमध्ये एकच खळबळ

कळंब, भूम, वाशी, धाराशिव आदी तालुक्यांमध्ये या आवाजाची तीव्रता अधिक असल्याचे नागरिकांनी सांगितले. काही ठिकाणी नागरिक घराबाहेर पडले, तर सोशल मिडियावर याबाबत चर्चा रंगली. दरम्यान, वा घटनेनंतर लातूर येथील भूकंप मापन केंद्राशी संपर्क साधला असता कोणत्याही प्रकारच्या भूकंपाची नोंद झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले होते.

तज्ज्ञांची मदत घेण्याची गरज

विशेष म्हणजे, असे गृढ आबाज मागील दहा ते पंधरा वर्षांपासून अधूनमधून धाराशिव जिल्ह्यात ऐकू येत असून, त्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही, दरवेली चर्चेचा विषय ठरणाच्या या आवाजांबाबत प्रशासनालाही ठोस निष्कर्ष काढण्यात यश आलेले नाही. हा आवाज नेमका कशाचा याबाबत प्रशासनाने केंद्र सरकार तसेच तज्ज्ञांची मदत घेऊन यावर स्पष्टीकरण देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

एनसीएस' म्हणते भूकंप नाही काळजीचे कारणही नाही..!

दरम्यान, गुरुत्वरी दुपारी कळंब, वाशी, धाराशिव परिसरात भूगर्भातून गूढ़ आवाज होऊन भूकंपासारखा पका जाणवल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. या घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाने तात्काळ राष्ट्रीय स्तरावरील नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) मांच्याकडे पडताळणीसाठी पाठविली. त्यांच्या तपासणीनुसार या परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नसल्याचे कळविण्यात आले आहे.

त्यामुळे सदरील घटना भूगर्भातील नैसर्गिक आवाजाचा प्रकार असण्याची शक्यता आहे. वाराशिव जिल्ह्यासह शेजारील काही जिल्ह्यांमध्येही मागील काही दिवसांपासून अशा प्रकारचे भूगर्भातील आवाज येत आहेत, जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना आवाहन करण्यात येते की, नागरिकांनी पाबरून जाऊ नये, सतर्क राहावे व प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचेअनुपालन करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ति किरण पुजार यांनी केले.

एनसीएस' म्हणजे काय ?

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएम) ही भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयांतर्गत काम करणारी भूकंपशास्त्राशी संबंधित देशातील सर्वोच्च संस्था आहे. या संस्थेची मुख्य जबाबदारी आणि कार्ये अशी आहेत. ही संस्था भारतभर पसरलेल्या राष्ट्रीय भूकंपमापन केंद्रांच्या जाळयाद्वारे भूकंपांवर लक्ष ठेवते.

भारतात किंवा आनूबाजूच्या परिसरात भूकंप झाल्यास, त्याची तीव्रता, केंद्र आणि खोली याबद्दलची अचूक माहिती उल्फाळ सरकार आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला पुरवण्याचे काम ही संस्था करते. देशातील विविध भाांच्या भूगर्भीय हालचालींचा अभ्यास करून भूकंपाच्या धोक्यानुसार सिस्मिक झोनिंग मॅप तयार करण्यात या संस्थेचा मोठा वाटा असतो. भूकंपशास्त्र, भूकंपाचा अंदाज आणि पृथ्वीच्या पोटातील हालचाली यावर ही संस्था सातत्याने संशोधन करते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news