Mysterious Sound : पुन्हा गूढ आवाजाने भिंती थरथरल्या, नागरिकांमध्ये एकच खळबळ

शहरासह संपूर्ण जिल्ह्यात बुधवारी (दि. ४) सकाळी दोन वेळा गूढ आणि प्रचंड आवाज झाल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.
Mysterious Noise |
Mysterious Sound : पुन्हा गूढ आवाजाने भिंती थरथरल्या, नागरिकांमध्ये एकच खळबळFile Photo
Published on
Updated on

The walls trembled again with a mysterious sound, causing panic among the citizens

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात बुधवारी (दि. ४) सकाळी दोन वेळा गूढ आणि प्रचंड आवाज झाल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. सकाळी ९.२३ वाजता आणि त्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत ९.३३ वाजता हे आवाज ऐकू आले.

Mysterious Noise |
Dharashiv News : दरवर्षी स्फोट, तरीही प्रशासन ढिम्म

या आवाजामुळे अनेक घरांच्या खिडक्या हादरल्या, तर काही ठिकाणी घरातील भांडीही थरथरली. अचानक झालेल्या या घटनेमुळे अनेकांना १९९३ च्या भूकंपाची आठवण झाली. या गूढ आवाजानंतर नागरिकांनी एकमेकांना फोन करून आवाज झाल्याची खात्री केली.

Mysterious Noise |
Tanaji Sawant inquiry threat: थांब तुझी चौकशीच लावतो... तानाजी सावंतांनी बंडखोर उमेदवारालाच धरला दम, Video होतोय व्हायरल

कळंब, भूम, वाशी, धाराशिव आदी तालुक्यांमध्ये या आवाजाची तीव्रता अधिक असल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, सोशल मीडियावर पुन्हा एकदा जुन्याच आशयाचे संदेश व्हायरल झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news