

MP Rajenimbalkar visits villages affected by heavy rains in Kalamb taluka
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : कळंब तालुक्यातील जवळा खुर्द, देवळाली, वाठवडा, पाडोळी, ढोराळा व उमरा तसेच धाराशिव तालुक्यातील कोल् हेगाव येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिके आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी नुकतीच या भागाची भेट देऊन पाहणी केली.
कळंब तालुक्यातील पाडोळी (ना) येथील जोशी काका यांचे पावसामुळे दुर्दैवी निधन झाले. त्यांना ग्रामीण रुग्णालय, मुरुड येथे उपचारासाठी दाखल केले असता, त्यांचा मृत्यू झाला. ही घटना कालच्या पावसामुळे झालेल्या जीवित हानीमुळे अत्यंत दुर्दैवी ठरली आहे. कळंब व धाराशिव तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.
काही दिवस विश्रांती घेत-लेल्या पावसाने परत एकदा धाराशिव जिल्ह्यात रौद्ररूप धारण केले असून, मोठ्या प्रमाणात शेती आणि पिकांचे नुकसान झाले आहे. सध्या सोयाबीन पिकाचा हंगाम सुरू असून, बऱ्याच ठिकाणी सोयाबीन काढण्यास सुरुवात झाली आहे. परतीच्या पावसामुळे उरलेले सोयाबीन देखील नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. शासनाकडून तुटपुंजी मदत जाहीर करण्यात आली आहे, परंतु प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, असे खा. राजेनिंबाळकर यांनी सांगितले.