Naldurg Fort : नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्याचे रुपडे पालटणार

१४ कोटींचा विकास आराखडा तयार : आमदार राणाजगजितसिंह पाटील
Naldurg Fort
Naldurg Fortpudhari photo
Published on
Updated on

नळदुर्ग : राज्यातील भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा भुईकोट किल्ला अशी ख्याती असलेल्या व स्थापत्यशास्त्राचा अजोड नमुना समजल्या जाणाऱ्या नळदुर्ग किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी तब्बल १४ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. या किल्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मूळ स्वरूपात दुरुस्ती करण्यासाठी सुमारे १० कोटी ८७ लाख रुपयांचा सविस्तर आर-ाखडा तयार करण्यात आला आहे. तर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून चार कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणा-जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

पुरातत्त्व विभागाच्या वैभव संगोपन योजनेंतर्गत केलेल्या विकास कामामुळे मागील काही वर्षांपासून नळदुर्ग किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. पुढील काळात त्यात आणखी वाढ व्हावी आणि पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण व्हावे यासाठी नळदुर्ग किल्ल्याचा चौदा कोटी रुपयांचा सविस्तर विकास आराखडा तयार करण्यात आला असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

Naldurg Fort
Minor girl assault case : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार; आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरी

पुणे येथील वास्तुविशारदांमार्फत तयार करण्यात आलेल्या या प्रस्तावात अनेक महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे. त्यानुसार ऐतिहासिक वस्तूंच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्यात आले आहे. किल्ल्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेला हत्तीखाना, कचेरी, मशीद, रंगमहाल आणि धान्य कोठाराचे जतन केले जाणार आहे. तसेच तटबंदीच्या भेगांचे ग्राऊटिंग करून त्याचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे.

रणमंडल भागातील पडझड रोखणे आणि उपली बुरुजाचे मजबुतीकरण याचाही या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनाबरोबरच पर्यटकांच्या सोयी सुविधांसाठीही या आराखड्यात विशेष तरतूद करण्यात आली आहे. बोटिंग परिसरात दगडी पायऱ्या, संपूर्ण किल्ल्यात दगडी पाथवे आणि दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत. तसेच स्वच्छता व सौंदर्याकरणावर विशेष लक्ष देण्यात आले आहे.

Naldurg Fort
Hindu community education USA : अमेरिकेत 'हा' समुदाय आहे सर्वाधिक शिक्षित, आकडेवारी थक्क करणारी !

किल्ल्याच्या भिंतीवरील झाडे-झुडपे काढणे आणि शास्त्रोक्त पद्धतीने उत्खनन करून हा अभिमानास्पद प्राचीन वारसा ठळकपणे पुन्हा एकदा जगासमोर मांडला जाणार असल्याचे आ. पाटील यांनी म्हटले आहे. तसेच यामुळे स्थानिक युवकांना हक्काचा रोजगार मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news