

Marud to Yedshi road is in bad condition
Marud to Yedshi road is in bad conditionधाराशिव, पुढारी वृत्तसेवाः टेंभूर्णी ते लातूर हा राज्य मार्ग क्रमांक ७७ मुरुड अकोला ते येडशी पावसामुळे, व बेडशी जवळ ठेकेदाराने एक वर्षाखाली उखडून ठेवल्याने खड्डेमय झाल्यामुळे वाहनध-ारकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
लातूर पूर्व भागातील लोकांना लातूरवरून मुरुड, बार्शी टेंभूर्णी मार्गे पुणे जाणाऱ्या जवळपास सत्तर टक्के लहान मोठे वाहणे लातूर, तुळजापूर, सोलापूर टेम्भूर्णी मार्ग पुणे, मुंबईला किमान १०० किलोमीटर लांबून जावे लागत असल्याने मोठा फटका सहन करावा लागत आहे. तर लातूरच्या पश्चिम भागातील लोकांना ढोकी फाटा, आळणीफाटामार्गे टोलनाका ओलांडून येडशीवरून बार्शीकडे निघावे लागत आहे. येडशी पर्यंत खराब रस्त्यात जीव मुठीत धरून मार्ग काढत जावे लागत आहे.
यंदा सतत पाऊस पडत गेल्याने रस्त्यावर खड्डे वाढले आहेत. टेंभूर्णी ते लातूर हे अंतर सुमारे १७० किलोमीटर आहे. यासाठी तब्बल पाच तास लागत असून मोठमोठे खड्डे पडल्याने चारचाकी वाहने या खड्यात अडकून वाहनांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे नाईलाजाने लातूरच्या पलीकडील चार चाकी प्रवाशानी लातूर,तुळजापूर, सोलापूरमार्गे पुण्याला जाण्याचा मार्ग निवडला आहे.
हे अंतर १०० किमी अधिक असले तरी नाईलाजाने त्यांना हाच मार्ग बरा वाटत आहे. या मार्गावर तामळवाडी टोलनाका, मोहोळ टोल नाका आहे. तो अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत आहे. पैशाबरोबर इंधनाचाही अपव्यय होत आहे. लातूरच्या अलीकडील चारचाकी प्रवाशी ढोकी फाटा ते आळणी फाट्यावरून येडशी येथून टोल नाक्याचे पैसे भरून पुढे बार्शीकडे मार्गस्थ होत आहेत.
त्यामुळे पैसा, वेळ, इंधन जास्त लागत आहे. गेल्या काही वर्षापासून हा प्रकार सुरू असूनही सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे डोळेझाक केले दिसत आहे. या मार्गावर अपघातात अनेकांचा बळी गेल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. येडशी, तडवळे ते मुरुडपर्यंत या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून जागोजागी खड्डे पडल्याने मोठ्या अपघाताची भीती व्यक्त होत आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.