Mankeshwar temple protest : श्रीक्षेत्र माणकेश्वर मंदिर पावित्र्यासाठी आमरण उपोषण सुरूच

अतिक्रमण व अवैध मद्यविक्रीविरोधात गणेश महाराज अंधारे यांचा लढा
Mankeshwar temple protest
श्रीक्षेत्र माणकेश्वर मंदिर पावित्र्यासाठी आमरण उपोषण सुरूचpudhari photo
Published on
Updated on

भूम : भूम तालुक्यातील माणकेश्वर येथील श्रीक्षेत्र माणकेश्वर महादेव मंदिर परिसरातील अतिक्रमण तसेच अवैध मद्यविक्रीविरोधात ह.भ.प. गणेश महाराज अंधारे यांनी सोमवार (दि.6) पासून सुरू केलेले अन्नत्याग आमरण उपोषण गुरुवारी चौथ्या दिवशीही सुरूच असून आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. उपोषणस्थळी ग्रामस्थ, तरुण व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करत आहेत.

माणकेश्वर येथील गट क्रमांक 318 मधील सरकारी जमिनीवर असलेल्या श्रीक्षेत्र माणकेश्वर महादेव मंदिर परिसरात प्रशासनाने पूर्वी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाची उघडपणे पायमल्ली होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. मंदिर परिसरात मांसाहार व मद्यविक्री सुरू असल्याचा गंभीर आरोप करत अतिक्रमण तातडीने हटविण्याची मागणी करण्यात आली आहे.

Mankeshwar temple protest
Las Kalyanachi vaccination awareness : लस कल्याणाची मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

यासंदर्भात प्रशासनाला अनेक वेळा निवेदन देऊनही ठोस कारवाई न झाल्याने अखेर गणेश महाराज अंधारे यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला. लढणार आणि जिंकणार सुद्धा हा निर्धार व्यक्त करत मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी हा संघर्ष सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Mankeshwar temple protest
Las Kalyanachi vaccination awareness : लस कल्याणाची मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दरम्यान, प्रशासनाने अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. उपोषणाचा चौथा दिवस सुरू असताना गणेश महाराज अंधारे यांची प्रकृती खालावत असल्याने ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news