veterinary negligence livestock case : खिल्लार गायीला जर्सी जातीचे वासरू; पशुवैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार

खिल्लार जातीच्या गायीला जर्सी (होस्टन) जातीचे वासरू जन्माला आल्यामुळे संबंधित पशुपालकाचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा
veterinary negligence livestock case
खिल्लार गायीला जर्सी जातीचे वासरू; पशुवैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध तक्रारpudhari photo
Published on
Updated on

परंडा : तालुक्यातील लोणी येथे कृत्रिम रेतन प्रक्रियेत हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करत पशुवैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. खिल्लार जातीच्या गायीला जर्सी (होस्टन) जातीचे वासरू जन्माला आल्यामुळे संबंधित पशुपालकाचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

या बाबत लोणी (ता. परंडा, जि. धाराशिव) येथील पशुपालक महावीर वसुदेव शिंदे यांनी लोणी येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-2 मधील तत्कालीन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सरपणे यांच्याविरुद्ध लेखी तक्रार दिली आहे. शिंदे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्याकडे शुद्ध खिल्लार जातीची गाय असून 30 मे 2025 रोजी त्या गाईचे कृत्रिम रेतन लोणी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात करण्यात आले होते.

veterinary negligence livestock case
Annabhau Sathe memorial project : अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी जागा हस्तांतरित

रेतन करताना खिल्लार जातीचे वीर्य वापरण्याची स्पष्ट मागणी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार पैसेही आकारण्यात आले आणि त्यांनी ते भरले होते. मात्र 6 मार्च 2026 रोजी गाय व्याल्यानंतर तिला जर्सी जातीचे वासरू जन्माला आले.

खिल्लार गायीला जर्सी वासरू जन्माला येणे हे कृत्रिम रेतन करताना चुकीचे वीर्य वापरले गेल्याचे किंवा तांत्रिक हलगर्जीपणाचे द्योतक असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. या प्रकारामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले असून जातिवंत जनावराची गुणवत्ता आणि प्रजातीही धोक्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

veterinary negligence livestock case
Kolhapur Gokul Breaking | दैनिक पुढारीचे वृत्त तंतोतंत खरे! त्या 1200 दूध संस्थांचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात!

या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करावी तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी पशुपालक महावीर शिंदे यांनी तक्रारीतून केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news