Jaggery Powder Business : गूळ पावडर कारखानदारांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

उद्योगाला योग्य दिशा देण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार
Jaggery Powder Business
धाराशिव : गूळ पावडर कारखानदार संघटनेच्या बैठकीला उपस्थित पदाधिकारी. pudhari photo
Published on
Updated on

धाराशिव : महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील गूळ पावडर उत्पादक कारखान्यांची संघटना इनोव्हेटिव्ह जॅगरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत चालू ऊस गाळप हंगामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी ड. व्यंकटराव गुंड होते.

बैठकीदरम्यान गूळ पावडर उत्पादक कारखान्यांच्या गाळपाची सद्यस्थिती, उपलब्ध ऊस, उत्पादन खर्च तसेच बाजारातील मागणी व पुरवठा यावर सखोल चर्चा झाली. येत्या काळातील ऊस गाळपाचे नियोजन, गूळ पावडर विक्रीसाठी किमान व योग्य दर निश्चिती, आर्थिक शिस्त राखणे, बाजारातील वाढती स्पर्धा, वाहतूक व साठवणूक व्यवस्थापन तसेच कामगारांच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

Jaggery Powder Business
Brinjal Prices Crash : बाजारात वांग्यांची बेभाव विक्री

या बैठकीस इजमाचे कार्यकारी अध्यक्ष तथा रूपामाता उद्योग समूहाचे संस्थापक ड. गुंड, सिद्धिविनायक समूहाचे संस्थापक तथा सचिव दत्ता कुलकर्णी, उपाध्यक्ष तथा डी.डी.एन. समुहाचे चेअरमन विजय नाडे, कोषाध्यक्ष तथा एसएमडी समूहाचे चेअरमन हणुमंत मडके, तज्ज्ञ संचालक प्रवीण प्रजापती, कुलस्वामिनीचे संस्थापक मधुकर तावडे, चेअरमन आकाश तावडे, तुळजाभवानी शुगरचे चेअरमन अनिल काळे, हणुमान खांडसरीचे चेअरमन रामनिवास अग्रवाल, रूपामाता पॉवरचे कार्यकारी संचालक ड. अजित गुंड, दत्तकृपाचे चेअरमन शरद पाटील, निमजाईचे चेअरमन मकरंदराजे राजेनिंबाळकर, साईप्रसाद शुगरचे चेअरमन बबनराव गवते, गुलमेश्वर शुगरचे व्हाईस-चेअरमन सिद्धेश्वर वायकर, बळीराजा ॲग्रोचे चेअरमन एकनाथ चाळक, शिवाजीराव ॲग्रोचे चेअरमन रवींद्र काळे, आशापुरक ॲग्रोचे संचालक वरद चरखा, गोपाळबुवा शुगरचे संचालक राजेश कराड, युके फार्म्सचे चेअरमन ओंकार खुर्पे, सोनाई ॲग्रोचे चेअरमन प्रा. टी. पी. मुंडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Jaggery Powder Business
Latur Municipal Election : मनपा निवडणूक बंदोबस्तासाठी 1313 पोलिस फोर्स

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news