Governor Vishnudev Varma | दुष्काळ निवारणासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने सुरू : राज्यपाल

उमरगा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांच्याकडून पाहणी
Dharashiv Drought Situation
राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांनी छत्रपती शिवाजी महाविद्यालयात शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्याPudhari
Published on: 
Updated on: 

Dharashiv Drought Situation

उमरगा : सातत्याने दुष्काळ आणि भूकंपाच्या संकटांना सामोरे जाणाऱ्या या भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. दुष्काळ निवारणासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्यात येतील, अशी ग्वाही राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांनी गुरुवारी (दि १९) बलसूर येथे दिली.

उमरगा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करताना राज्यपाल वर्मा यांनी बलसूर येथील कोरडा पडलेला तलाव, नाला सरळीकरणाचे काम तसेच पाण्या अभावी वाळून गेलेल्या शेती पिकांची पाहणी केली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाविद्यालयात शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. जकेकूर चौरस्ता येथील औद्योगिक वसाहतीत हेलिकॉप्टरने आगमन झाले. त्यानंतर राज्यपालांनी बलसूर येथे पाहणी दौरा केला.

Dharashiv Drought Situation
Umarga News : कॅनमध्ये डिझेल देण्याची शेतकऱ्यांची मागणी

यावेळी ते म्हणाले, पावसाचे प्रमाण अधिक असताना पाण्याच्या संवर्धनाकडे आपण पुरेसे लक्ष देत नाही. मात्र, पाऊस कमी झाल्यानंतर उपाययोजनांचा विचार सुरू होतो. त्यामुळे जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापनाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. दुष्काळ आणि जलसंकटाचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी बलसूर, कलदेव लिंबाळा यांसह परिसरातील विविध गावांच्या ग्रामस्थांनी आपल्या समस्या मांडत राज्यपालांना निवेदने दिली.

यावेळी राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदळकर, आमदार प्रवीण स्वामी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, सभापती ॲड आकांक्षा चौगुले, नगराध्यक्ष किरण गायकवाड, जिल्हा परिषद सदस्या सविता बिराजदार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.