Umarga News : कॅनमध्ये डिझेल देण्याची शेतकऱ्यांची मागणी

शेतकऱ्यांना पेट्रोल पंपावर कॅनमध्ये डिझेल देत नसल्यामुळे त्रिकोळी ता उमरगा येथील वैतागलेल्या ट्रॅक्टर धारक शेतकऱ्यांनी कॅनसहित गुरुवारी, (दि ०४) तहसील कार्यालय गाठले.
Umarga News
Umarga News : कॅनमध्ये डिझेल देण्याची शेतकऱ्यांची मागणीfile photo
Published on
Updated on

Farmers' demand for diesel in cans

उमरगा, पुढारी वृत्तसेवा शेतकऱ्यांना पेट्रोल पंपावर कॅनमध्ये डिझेल देत नसल्यामुळे त्रिकोळी ता उमरगा येथील वैतागलेल्या ट्रॅक्टर धारक शेतकऱ्यांनी कॅनसहित गुरुवारी, (दि ०४) तहसील कार्यालय गाठले. यावेळी कॅनमध्ये डिझेल देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

Umarga News
Hingoli Diesel Shortage : कुणी डिझेल देता का डिझेल!

पेट्रोल पंपमालक सध्या डिझेलचा तुटवडा असल्याचे सांगून ट्रॅक्टरधारक शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देत नसल्याच्या घटना घडत आहेत. ट्रॅक्टर पंपावर घेऊन या मगच डिझेल भरून देऊ म्हणत कॅनमध्ये डिझेल देत नाहीत. शेतापासून पेट्रोल पंपाचे अंतर लांब आहे. त्यातच कामावरील चालू ट्रॅक्टर पंपावर आणणे परवडणारे व शक्य नाही.

पंपधारक कॅनमध्ये डिझेल भरायला नकार देत आहेत. याला वैतागलेल्या त्रिकोळी येथील ट्रॅक्टर धारक शेतकऱ्यांनी डिझेलच्या मागणीसाठी हातात रिकामे कॅन घेऊन चक्क तहसील कार्यालय गाठत तहसीलदारांना निवेदन दिले.

Umarga News
Nanded Diesel Shortage | हिमायतनगरमध्ये डिझेल टंचाई; शेतकऱ्यांची मशागतीची कामे ठप्प, ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा

यावेळी कॅनमध्ये डिझेल देण्यास पंप चालकांनी टाळाटाळ केल्यास आंदोलनांचा इशारा दिला आहे. यावेळी सदानंद तुकशेट्टी, अकबर पटेल, ज्ञानेश्वर मुगळे, महेश कोडगीर, हरी सुरवसे, तात्याराव अंबुलगे, लक्ष्मण शिंदे आदींसह ट्रॅक्टर मालक शेतकरी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news