Gajanan Maharaj Palkhi : गजानन महाराज पालखीचे तुळजापुरात स्वागत

नगरपरिषदेतर्फे स्वच्छता मोहीम
Gajanan Maharaj Palkhi
Gajanan Maharaj Palkhi : गजानन महाराज पालखीचे तुळजापुरात स्वागतfile photo
Published on
Updated on

Gajanan Maharaj Palkhi welcomed in Tuljapur

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा: संत श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे तुळजापूर शहरात भक्तिमय वातावरणात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. नगरपरिषद कार्यालयाच्या वतीने श्रींच्या पालखीचे मानाचे पहिले स्वागत नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या हस्ते करण्यात आले. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाने शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला.

Gajanan Maharaj Palkhi
Parli Saraswati river project : सरस्वती नदी संरक्षक बांधकाम प्रकल्पाला ब्रेक

नगरपरिषदेच्या वतीने कणे स्टॉप, धाराशिव रोड येथे पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी नगरसेविका प्रियाताई गंगणे, मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, उपनगराध्यक्ष रामचंद्र रोचकरी, नगरसेवक लखन पेंदे, नरेश आमृतराव, आनंद सावंत, दिनेश क्षीरसागर, विजय कंदले, अमर हंगरगेकर, नगरसेविका निता क्षीरसागर आदी उपस्थित होते.

पालखी सोहळ्यासाठी शहरातील रस्ते, परिसर आणि प्रमुख मार्गाची स्वच्छता करण्यात आली होती. तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने ठिकठिकाणी रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यात आले. त्यामुळे तुळजापूर शहर भक्तीमय वातावरणात सजले होते.

Gajanan Maharaj Palkhi
'सियावर रामचंद्र की जय'चा शहरात जयघोष

यावेळी नगरपरिषद कार्यालयातील नगर अभियंता अतुल तोंडारे, चांगदेव ढोले, बापूसाहेब रोचकरी, बालाजी कोळी, प्रशांत चव्हाण, विश्वास मोटे, बालाजी जाधव, सुनील पवार, लेखापाल शरयू पाटील, पुष्पांजली मंगरुळे, संज्योत सावंत यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पालखी सोहळ्याच्या स्वागतानिमित्त नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी तुळजापूर शहरवासीयांना शुभेच्छा दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news