

Flower decoration at Tulja Bhavani Temple
तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव उत्साहात सुरू झाला आहे. या महोत्सवानिमित्त मंदिर परिसरात १२ प्रकारच्या विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
सुमारे १८ कलाकारांनी दोन दिवस परिश्रम डे घेऊन राजे शहाजी महाद्वार, छत्रपती शिवाजी गे महाराज महाद्वार, राजमाता जिजाऊ महाद्वार, निंबाळकर दरवाजा, होमकुंड, गणेश मंदिर, देवीचा ना गाभारा यांसह संपूर्ण मंदिर परिसर फुलांनी सजवला ब आहे. फुलांच्या सजावटीसोबत विद्युत रोषणाईमुळे ८, मंदिर परिसर मंगलमय आणि तेजस्वी भासत असून भाविकांना अद्वितीय अनुभव मिळत आहे.
यामुळे तुळजापूरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले असून भाविक उत्साहाने धार्मिक विधी पार पाडत आहेत. पावसामुळे भाविकांना अडचणी येत असल्या तरी कर्नाटक व लातूर मार्गावरून पायी येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी दिसत आहे.