Dharashiv News : पोलिस वसाहतीच्या जागेवर घाणीचे साम्राज्य

कसबे तडवळे : इंग्रजकालीन वास्तू नामशेष तरीही प्रशासन हलेना
Filth at police colony premises
कसबे तडवळे : इंग्रजकालीन पोलिस वसाहत गेल्या पंचवीस वर्षांपासून पडझड झाली असून परिसरात काटेरी झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात गवत, सांडपाणी तुंबन डासांचा व घाणीचा त्रास वाढला आहे. pudhari photo
Published on
Updated on

विकास उबाळे

कसबे तडवळे : गावातील मुख्य बाजार मैदानालगत असलेली गृहखात्याची 17 गुंठे जागा सध्या अडगळीत पडली असून परिसरातील नागरिकांसाठी ती मोठी डोकेदुखी ठरत आहे. या जागेवर इंग्रजकालीन पोलिस वसाहतीची पडझड झालेली इमारत उभी आहे. गवत, काटेरी झाडे आणि कचऱ्याचा साठा वाढल्याने सापांचा वावर वाढला असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कसबे तडवळे हे गाव इंग्रजकालीन इतिहासाशी जोडलेले आहे. त्या काळात पांगरी पोलिस ठाण्यांतर्गत येथे पोलिस चौकी होती. या 17 गुंठे जागेत दगडी बांधकामाच्या पाच पोलिस वसाहती उभारण्यात आल्या होत्या. पुढे सुमारे 1970 नंतर गावाचा समावेश सोलापूर जिल्ह्यातून धाराशिव जिल्ह्यात करण्यात आला आणि ढोकी पोलिस ठाण्यांतर्गत तडवळे बीट कार्यरत झाले. सुमारे वीस वर्षे येथे पोलिस अधिकारी व कर्मचारी वास्तव्यास होते; मात्र 1995 नंतर ही वसाहत पूर्णपणे बंद पडली.गेल्या वीस वर्षांत इमारतींची दुरुस्ती न झाल्याने कौलारू छप्पर कोसळले आहेत.

Filth at police colony premises
New district court Dharashiv : धाराशिव येथे साकारणार सहा मजली जिल्हा न्यायालय

पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर गवत व झाडे वाढली असून परिसरात सापांचा वावर वाढला आहे. चारही बाजूंनी दाट लोकवस्ती असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कचरा टाकण्यामुळे दुर्गंधी पसरत असून डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. अनेकदा ग्रामपंचायतीने पोलिस व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार केला; मात्र ठोस कार्यवाही झालेली नाही.गावातील नेत्यांनी ही जागा ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यासाठी प्रयत्न केले; परंतु ती गृहखात्याची मालमत्ता असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेला थेट हस्तक्षेप करता येत नसल्याची चर्चा आहे.

Filth at police colony premises
Jalna road accident : आयशरची दुचाकीला धडक; युवक ठार

दरम्यान,“ही 17 गुंठे जागा ग्रामपंचायतीकडे वर्ग करावी किंवा किमान सुरक्षा भिंत उभारावी, अशी आमची मागणी आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी पवार व सहायक पोलिस निरीक्षक विलास हजारे (ढोकी) यांच्यासोबत चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे उपसरपंच हारुण शेख यांनी सांगितले.

या गृहखात्याच्या जागेबाबत आमदार व खासदारांच्या माध्यमातून पोलिस अधीक्षकांशी चर्चा करण्यात आली आहे. लवकरच यावर तोडगा निघेल, अशी अपेक्षा आहे.

स्वाती विशाल जमाले, सरपंच, कसबे तडवळे.

पडझड झालेल्या इमारतीत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डासांचा प्रादुर्भाव व सापांचा वावर वाढल्याने आरोग्य व सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. संबंधित विभागाने तातडीने लक्ष द्यावे.

राम दिघे, ग्रामस्थ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news