Chhatrapati Sambhajinagar FDA Raid : सुंदरवाडीत २० लाखांचे 'पतंजली' तूप जप्त ! लासूरच्या तेल रिपॅकिंग युनिटचा परवाना निलंबित

कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली असून, भेसळखोरांचे धाबे दणाणले आहे.
Chhatrapati Sambhajinagar FDA Raid
एफडीएने कारवाईत जप्त केलेला साठा.pudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : सणासुदीच्या तोंडावर आरोग्याशी खेळणाऱ्या सुंदरवाडी येथील 'मेसर्स दिव्य महावितरक या गोदामातून छापा टाकत एफडीए पथकाने तब्बल २० लाख रुपयांहून अधिक किंमतीचा संशयास्पद पतंजली गायीचे तूप जप्त केले. तर गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील 'मे. रवी ऑइल इंडस्ट्रीजमधून सुमारे ५ लाखांचे भेसळयुक्त तेल साठा जप्त करत या रिपॅकिंग युनिटचा अन्न परवाना तत्काळ निलंबित केला. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली असून, भेसळखोरांचे धाबे दणाणले आहे.

सुंदरवाडी (केंब्रिज स्कूलजवळ) येथील दिव्य महावितरक (पतंजली आयुर्वेद सुपर डिस्ट्रीब्युटर) यांच्या गोदामावर एफडीएने धाड टाकली. यात मिथ्याछाप किंवा भेसळयुक्त असण्याच्या संशयावरून एकूण ४,०३२ युनिट्स (२,२७९.७ लीटर) तब्बल २० लाख २० हजार, १९० रुपये किंमतीचे पतंजली गायीचे तूप जप्त करण्यात आले आहे.

Chhatrapati Sambhajinagar FDA Raid
Karjat Tree Cutting : टोरंट प्रकल्पाच्या वृक्षतोडीमुळे साईडोंगरचे जंगल धोक्यात

दुसऱ्या कारवाई लासूर स्टेशन येथील रवी ऑइल इंडस्ट्रीजची अचानक तपासणीत अनेक गंभीर त्रुटी व अनियमितता समोर आल्या. उत्पादन परवाना असताना प्रत्यक्षात केवळ रिपॅकिंग करणे म्हणून व्यवसाय सुरू होता. उघड्या खिडक्यांना आणि कर्मचाऱ्यांना संरक्षणात्मक कपडे पुरवले गेले नव्हते.

खाद्यपदार्थ, पाण्याचे प्रयोगशाळा चाचणी अहवाल आणि पॅकिंग साहित्याचे प्रमाणपत्र उपलब्ध नव्हते. तसेच वेळ-तापमान नियंत्रण, यंत्रांची देखभाल नोंदी नव्हत्या. यामुळे ग्राहकांना दूषित अन्न पोहोचण्याचा धोका असल्याने २७१ किलो रिफाइंड सोयाबीन ऑइल (किंमत ४,८७,०००/-) चा साठा जप्त करून सहायक आयुक्त (अन्न) द. वि. पाटील यांनी या आस्थापनेचा परवाना तत्काळ निलंबित केला.

Chhatrapati Sambhajinagar FDA Raid
Marathwada Court Bomb Threat : मराठवाड्यातील न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

प्रशासनाचा कडक इशारा : नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या भेसळयुक्त किंवा असुरक्षित अन्नपदार्थांच्या विक्रीविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाची (एफडीए) ही धडक मोहीम यापुढेही अशीच तीव्रतेने सुरूच राहील, असा सज्जड इशारा सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.