

वाशी : नातेसंबंधातील प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी दर्शवणारी एक अनोखी घटना वाशी तालुक्यातील पारा (जि. धाराशिव) येथे घडली आहे. सासऱ्यांनी आपल्या जावयाला अधिक महिन्यात धोंडे दान म्हणून चक्क देखणी सिंधी घोडी भेट दिल्याची चर्चा सध्या परिसरात रंगत आहे.
पारा येथील विलास झांबरे यांनी आपल्या जावई क्रांतीसिंह राऊत (रा. ईट, ता. भूम) यांना फोन करून, "तुमच्या घरी शेतउपयोगी साहित्याचे पार्सल आले आहे, ते उतरून घ्या," असे सांगितले. सासऱ्यांचा फोन आल्यानंतर जावयांनाही काही शेतीसाठी लागणारे साहित्य आले असावे, असे वाटले. मात्र घरी पोहोचल्यानंतर त्यांच्या समोर सुंदर आणि देखणी सिंधी घोडी उभी असल्याचे पाहून त्यांना सुखद धक्का बसला.
याबाबत माहिती देताना विलास झांबरे म्हणाले की, मुलीचे लग्न लॉकडाऊन काळात अत्यंत साध्या पद्धतीने आणि घाईगडबडीत पार पडले होते. त्या काळात कोणताही मोठा सोहळा किंवा हौस पूर्ण करता आली नव्हती. सध्याच्या वाढत्या इंधन दरांचा आणि भविष्यातील इंधनटंचाईच्या शक्यतेचा विचार करत असताना जावई क्रांतीसिंह राऊत यांना घोड्यांची विशेष आवड असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यातूनच शांत स्वभावाची रेवाड चाल चालणारी उत्तम सिंधी घोडी भेट देण्याची कल्पना सुचली.
ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांन साळेगाव येथील व्यापारी सलमान काइ यांच्याकडे जाऊन घोडीची पाहणी केली अपेक्षित गुणधर्मांनुसार घोडी पसंत पडल्यान त्यांनी कोणालाही कल्पना न देता व्यवहार पूर्ण केला आणि थेट जावयासाठी सरप्राईजच् योजना आखली. सासरा जावई यांच्यातीट प्रेमळ नात्याचे हे उदाहरण सध्या परिसरा चर्चेचा विषय ठरत असून या अनोख्य सरप्राईजचे सर्वत्र कौतुक होत आहे.