Discussion with MP Pawar on the problems of earthquake victims in Umarga taluka
उमरगा, पुढारी वृत्तसेवा उमरगा लोहारा तालुक्यातील भूकंपाने बेचिराख झालेल्या गावांचा नव्याने पुनर्वसन विकास आराखडा तयार करून माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यासमोर आमदार प्रवीण स्वामीं यांनी मुंबईत सादर करून याबाबत सविस्तर चर्चा केली.
सन १९९३ साली झालेल्या महा प्रलयंकारी किल्लारी सास्तुरच्या भूकंपाने जगाचे लक्ष वेधून घेतले. गणेश विसर्जन मिरवणूक संपवून विसावलेल्या गणेश भक्तांना धरणी कंपानी क्षणार्धात जीवनयात्रा संपवावी लागली. त्याला ३२ वर्षे पूर्ण झाली, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी युद्धपातळीवर कामे करून लोकांना तात्काळ मदतीसाठी सर्व शक्ती पणाला लावली. दररोज किल्लारी, सास्तुर परिसरात स्वतः भेटी देऊन मदत कार्य राबविले. त्याला जवळपास ३० वर्षे ओलांडून गेली, त्यानंतर या भूकंपग्रस्तांना पुन्हा कोणतीही मदत झाली नाही.
या भागातील कुटूंब व लोकसंख्या वाढली, तत्कालीन घरे अपूरे पडत आहेत. अनेक घरांना तडे गेले आहेत. रस्ते उखडले आहेत. गावचे पूनर्वसन झाले असले तरी पुन्हा या गावात समस्या आ वासून उभ्या आहेत. आमदार स्वामी यांनी उमरगा लोहारा तालुक्यातील ३७ गावाचा नव्याने पूनर्वसन आराखडा तयार केला आहे. या कामी मदत करून शेतकरी आणि जनतेला मदत करण्याचे आश्वासन शरद पवार यांनी दिले असल्याचे स्वामी यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री आमदार जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमरगा तालुका अध्यक्ष संजय पवार, इस्माईल शेख आदींची उपस्थिती होती.
शरद पवार यांनी भूकंपातील अनेक आठवणींना उजाळा दिला. या भागातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांची स्थिती जमिनी खरडून गेल्याने शेतीचे झालेले नुकसान, पशुधनाची हानी आणि परिसरातील प्रत्येक नागरिकांची गावनिहाय आस्थेवाईक चौकशी केली. पवार यांनी प्रत्येक गावाच्या समस्या जाणून घेत अनेक आठवणींना उजाळा दिला असल्याचे आमदार स्वामी यांनी सांगितले. उमरगा लोहारा तालुक्यासाठी तयार करण्यात आलेला ३७ गावांचा पुनर्सन विकास आराखडा पाहून त्यानीं समाधान व्यक्त केले. यासाठी मुख्यमंत्र्याशी स्वतः चर्चा करून संपूर्ण सहकार्य करण्याचें पवार सांगितले असल्याचे स्वामीं यांनी सांगितले.