Dharashiv education initiative : धाराशिव जि.प.कडून ‌‘टीव्ही बंद‌’उपक्रम

विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी 7 ते 9 वेळ राखीव
Dharashiv education initiative
धाराशिव जि.प.कडून ‌‘टीव्ही बंद‌’उपक्रमpudhari photo
Published on
Updated on

धाराशिव : जिल्ह्यातील ग््राामीण भागात विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला चालना देण्यासाठी जिल्हा परिषदेकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. रात्री 7 ते 9 या वेळेत प्रत्येक घरातील टीव्ही बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी बुधवारी (दि. 1) आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

स्थायी समितीच्या सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेत जि.प. अध्यक्षा पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभ्यासावर लक्ष केंद्रीत व्हावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असून, प्रत्येक गावात नागरिकांच्या सहभागातून समित्या स्थापन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. यासोबतच ममुख्यमंत्री समृद्ध ग््रााम योजनाफ अंतर्गत प्रत्येक गावात स्वतंत्र स्टडी रूम उभारण्याचे नियोजन सुरू आहे.

Dharashiv education initiative
Climate education program : शाळांमध्ये मिळणार हवामानाचे धडे

तसेच महिलांसाठी स्वतंत्र सभागृह उपलब्ध करून देण्याचाही विचार जिल्हा परिषद करत आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या मालकीच्या मोकळ्या जागांचा शोध घेऊन त्यांची कागदपत्रे डिजिटाईज करण्याची प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे. ग््राामीण विकासासाठी विविध योजना राबविण्याचा मानस असून, त्यासाठी आवश्यक निधी मडीपीडीसीफकडे मागविण्यात येणार असल्याचेही यावेळी पाटील यांनी सांगितले.

सेमी इंग््राजी वर्गांचीही सुरुवात

अध्यक्षा अर्चना पाटील यांनी येत्या शैक्षणिक वर्षापासून जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग््राजी वर्ग सुरू केले जाणार आहेत. तसेच शाळा एकत्रीकरणाच्या निर्णयाचीही अंमलबजावणी केली जाणार असून, यामध्ये कोणताही शिक्षक अतिरिक्त ठरणार नाही. अनेक गावांमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र शाळा आहेत, त्या आता एकत्रितपणे चालविण्यात येणार आहेत. असे सांगितले.

Dharashiv education initiative
ZP Smart Schools: जिल्हा परिषद शाळांना ‘स्मार्ट’ बनवण्याची मोहीम; डिजिटल शिक्षण व सेमी-इंग्रजी वर्गांवर भर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news