Climate education program : शाळांमध्ये मिळणार हवामानाचे धडे

आठवी, नववीच्या विद्यार्थ्यांसाठी केंब्रिजचा डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्म
climate education program
शाळांमध्ये मिळणार हवामानाचे धडेpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : लहानपणापासून पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‌‘केंब्रिज क्लायमेट क्वेस्ट‌’ या डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हवामान शिक्षण देण्याचा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे.

शालेय शिक्षण विभाग आणि केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

climate education program
MSRTC mega recruitment : एसटीमध्ये लवकरच चालक-वाहक पदांची मेगाभरती

मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, पर्यावरण व हवामान बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल तसेच दोन्ही संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी एससीईआरटीचे संचालक डॉ. हेमंत वासेकर आणि केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंटचे दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक अरुण राजामणी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले की, या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना पर्यावरण, हवामान बदल आणि शाश्वत विकासाशी संबंधित विषयांवरील सविस्तर अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जाणार आहे. सुरुवातीला आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांपासून या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाणार असून पुढील टप्प्यात तो अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येईल. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठीही शालेय शिक्षण विभाग विविध उपक्रम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, या सामंजस्य करारामुळे पर्यावरण संवर्धनाबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढण्यास मदत होईल. ई-लर्निंग कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे पर्यावरण विषयक ज्ञान मिळेल असे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले.

climate education program
Ashwini Vaishnaw : मुंबईसाठी तयार होत आहेत 238 नव्या बंद दार लोकल!

‌‘केंब्रिज क्लायमेट क्वेस्ट‌’ची वैशिष्ट्ये

‌‘केंब्रिज क्लायमेट क्वेस्ट‌’ हा कार्यक्रम केंब्रिजच्या डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्मद्वारे राबविण्यात येणार आहे. राज्यातील शासकीय, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना यात सहभागी होता येणार आहे. या अभ्यासक्रमात हवामान बदलाचे विज्ञान, परिसंस्था, समुदाय आणि अर्थव्यवस्थेवरील परिणाम, नवीकरणीय ऊर्जा, जबाबदार उपभोग आणि शाश्वत विकास यांसारख्या विषयांचा समावेश आहे.

कृतीआधारित शिक्षण पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांना पर्यावरणीय समस्यांवर चिकित्सक विचार करण्यास आणि दैनंदिन जीवनात शाश्वततेचे महत्त्व समजून घेण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना केंब्रिज युनिव्हर्सिटी आणि महाराष्ट्र शासनाचे संयुक्त प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

सध्या हा अभ्यासक्रम इंग्रजी भाषेत सुरू करण्यात येणार असून लवकरच त्याचा मराठी अनुवादही उपलब्ध करून देण्यात येईल.या सहकार्यांतर्गत केंब्रिजकडून अभ्यासक्रम मॉड्यूल, शिक्षकांसाठी प्रशिक्षण, मार्गदर्शिका, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे परीक्षण करण्यासाठी डिजिटल डॅशबोर्ड तसेच अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या उपक्रमाची अंमलबजावणी एससीईआरटी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि राज्यातील सहभागी शाळांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news