Dharashiv Crime : मंगळसूत्र चोरी करणाऱ्या टोळीला अटक

येडेश्वरी यात्रेदरम्यान पोलिसांची कारवाई; दोन महिलांसह अन्य एकजण ताब्यात
Dharashiv Yermala Yedeshwari Yatra theft
मंगळसूत्र चोरी करणाऱ्या टोळीला अटकpudhari photo
Published on
Updated on

धाराशिव : येरमाळा येथील येडेश्वरी यात्रेदरम्यान महिला भाविकांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. 3 एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली.

पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यात्रेतील गर्दीच्या ठिकाणी पायी गस्त घालत होते. यावेळी गुप्त माहितीदारामार्फत आमराई परिसरातील मंदिराजवळ दोन महिला व एक पुरुष संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती मिळाली.

Dharashiv Yermala Yedeshwari Yatra theft
Jalgaon Crime News | लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना लुटणाऱ्या 'पप्पू'च्या मुसक्या आवळल्या; 4 लाखांची कार जप्त

पथकाने तत्काळ त्या ठिकाणी जाऊन संशयितांवर पाळत ठेवली. गर्दीत ते चोरी करण्याच्या तयारीत असल्याचे लक्षात येताच त्यांना ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्यांना येरमाळा पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी करण्यात आली.

चौकशीदरम्यान आरोपींची नावे अनिल शेषेराव शिंदे (वय 34), सुनिता अनिल शिंदे (वय 29) आणि हिराबाई रमेश शिंदे (वय 40, सर्व रा. इंदिरानगर, पाथरी, जि. परभणी) अशी असल्याचे निष्पन्न झाले.पंचांच्या उपस्थितीत अंगझडती घेतली असता अनिल शिंदे याच्या पँटच्या खिशातून चार वेगवेगळे सोन्याचे मंगळसूत्र आढळून आले. त्याची किंमत सुमारे 1 लाख 31 हजार रुपये इतकी आहे.

Dharashiv Yermala Yedeshwari Yatra theft
Phaltan Honey Trap Case : हनी ट्रॅपमधील साखळी टोळी जेरबंद

चौकशीदरम्यान आरोपींनी कबुली दिली की, यात्रेदरम्यान अंघोळीसाठी व्यवस्था असलेल्या ठिकाणी महिला अंघोळ करत असताना त्यांच्या गळ्यातील दागिने चोरी करून ते अनिल शिंदे याच्याकडे देत असत. जप्त करण्यात आलेले सर्व दागिने पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके तसेच त्यांच्या पथकाने पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news