Dharashiv News | सरदार पटेल जयंतीनिमित्त येरमाळ्यात राष्ट्रीय एकता रॅली

सायबर सुरक्षेचा संदेश; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
Rashtriya Ekta Diwas
रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेचा संदेश देत नागरिकांमध्ये ऑनलाइन व्यवहारांबाबत जनजागृती केली.Pudhari
Published on: 
Updated on: 

Yermala Police Station

रत्नापूर : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त येरमाळा पोलीस ठाण्याच्या वतीने राष्ट्रीय एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेचा संदेश देत नागरिकांमध्ये ऑनलाइन व्यवहारांबाबत जनजागृती केली.

सायबर सुरक्षेचे संदेश असलेले विशेष टी-शर्ट परिधान करून विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले होते. तसेच सायबर सुरक्षा आणि राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व विशद करणारे डिजिटल बॅनर व फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. येरमाळा पोलीस ठाण्यापासून सुरू झालेली ही रॅली ब्रिज चौकापर्यंत काढण्यात आली.

Rashtriya Ekta Diwas
Dharashiv News : दसमेगाव-वाशी रस्त्याचे काम झाले सुरू

या रॅलीत सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत घोडके, पोलीस उपनिरीक्षक पवार, शेख, जाधव, क्षीरसागर यांच्यासह ठाणे अंमलदार व पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच ज्ञानोदय विद्यालयाचे मुख्याध्यापक मोरे सर, शिक्षक चांदणे सर, शिंदे सर, राठोड सर, वाघमारे सर, जळकोट सर, देवकर सर, पेजगुडे सर, कवडे सर, शिरसाट मॅडम आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन

नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना सतर्क राहावे, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये आणि संशयास्पद संदेशांना प्रतिसाद देताना काळजी घ्यावी. सायबर फसवणूक झाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देतानाच सायबर सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या रॅलीचा उद्देश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.