Maratha Protest | उमरगा येथे तहसीलदारांची खुर्ची मराठा आंदोलकांनी पेटवली; चौघे पोलिसांच्या ताब्यात

तहसील कार्यालयाच्या परिसरात मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी
Umarga Tehsildar Office Chair Set On Fire
तहसील कार्यालयात घुसून तहसीलदार यांच्या दालनातील खुर्ची पेटवून दिली.Pudhari
Published on
Updated on

Umarga Tehsildar Office Chair Set On Fire

उमरगा : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीवरून संतप्त झालेल्या मराठा आंदोलकांनी बुधवारी (दि ९) सकाळी दहाच्या सुमारास अचानक तहसील कार्यालयात घुसून तहसीलदार यांच्या दालनातील खुर्ची ओढून बाहेर काढत ज्वलनशील पदार्थ टाकून आवारात पेटवून दिली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी तहसील कार्यालयाचे कामकाज सुरू होण्याच्या वेळेस मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ, मराठा आरक्षण आणि शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत काही मराठा आंदोलक तहसीलदारांच्या दालनात शिरले, यावेळी आंदोलकाना शिपायाने थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी शिपायाला बाजूला सारत तहसीलदार यांची खुर्ची उचलून दालनाबाहेर काढली.

Umarga Tehsildar Office Chair Set On Fire
Dharashiv Drought | पिके वाळली, चारा-पाण्याची टंचाई : धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा

त्यानंतर मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ , मराठा आरक्षणाची तसेच शासन विरोधी जोरदार घोषणाबाजीत संताप व्यक्त करीत तहसील कार्यालयासमोर खुर्ची पेटवून दिली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ खळबळ उडाली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घटनास्थळावरून आण्णासाहेब पवार, महादेव माने, विठ्ठल पवार ( तिघेही रा नाईचाकूर, ता उमरगा) आणि वैजीनाथ काळे (रा. माडज, ता. उमरगा) या चार मराठा आंदोलकांना ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात आणले.

Umarga Tehsildar Office Chair Set On Fire
Dharashiv News : दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचा मोर्चा

दरम्यान सकाळची वेळ असल्याने तहसीलदार दालनात हजर नव्हते. तसेच कार्यालयातील कर्मचारी आणि कामानिमित्त आलेले नागरिकही तुरळक प्रमाणात उपस्थित होते. त्यामुळे पेटवलेल्या खुर्चीमुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, आगीत खुर्ची पूर्णपणे जळून खाक झाली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

शासकीय कार्यालयाच्या आवारात तहसीलदार यांच्या दालनातील खुर्चीला अशा प्रकारे आग लावण्यात आल्याने वातावऱण तंग बनले आहे. याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news