Tuljapur Darshan | उन्हाच्या कडाक्यातही तुळजाभवानी ; देवीच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ

मंदिर परिसरात सावलीच्या व्यवस्थेमुळे भाविकांना दिलासा
Tuljapur Darshan | उन्हाच्या कडाक्यातही तुळजाभवानी ; देवीच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ
Published on
Updated on

भीमाशंकर वाघमारे

तुळजापूर : राज्यासह तेलंगणा, आंध्र प्रदेश आदी भागांतून तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असून, वाढत्या उन्हाच्या तडाख्यातही भक्तांच्या श्रद्धेत कोणतीही कमी झालेली दिसून येत नाही. तुळजापूर तसेच धाराशिव परिसरात मागील पंधरा ते वीस दिवसांपासून तापमान ४१ अंशांच्या पुढे जात असतानाही हजारो भाविक सहकुटुंब तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत.

Tuljapur Darshan | उन्हाच्या कडाक्यातही तुळजाभवानी ; देवीच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ
भिरवंडेचे श्री रामेश्वर मंदिर

उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मंदिर संस्थानकडून मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर तसेच प्रदक्षिणा मार्गावर कपड्यांचे तात्पुरते छत उभारण्यात आले आहे. त्यामुळे दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना मोठा दिलासा मिळत आहे. दूरवरून आलेले अनेक भाविक मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर सावलीच्या ठिकाणी काही वेळ विसावा घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Tuljapur Darshan | उन्हाच्या कडाक्यातही तुळजाभवानी ; देवीच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ
Kolhapur Tourism | वैशिष्ट्यपूर्ण प्राचीन मंदिरांमुळे कोल्हापुरात धार्मिक पर्यटनाची पर्वणी

सध्या मंदिर परिसरात जीर्णोद्धार व सुशोभीकरणाची कामे सुरू असल्याने काही ठिकाणी सावलीची मर्यादा जाणवत असली, तरी प्रशासनाने केलेली व्यवस्था भाविकांसाठी उपयुक्त ठरत आहे. मात्र, प्रदक्षिणा मार्गालगत पिण्याच्या पाण्याची अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी भाविकांकडून होत आहे.

Tuljapur Darshan | उन्हाच्या कडाक्यातही तुळजाभवानी ; देवीच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ
Dahanu Mahalaxmi Yatra: डहाणूतील महालक्ष्मी यात्रेला भाविकांची प्रचंड गर्दी; महामार्गावर वाहनांच्या लाबाचं लांब रांगा

कोल्हापूरहून दर्शनासाठी आलेले भाविक अविनाश सरवदे यांनी, “उन्हाची तीव्रता लक्षात घेता मंदिर परिसरात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केल्यास भाविकांची मोठी गैरसोय टळेल,” असे मत व्यक्त केले. दरम्यान, सुट्यांचा कालावधी आणि धार्मिक श्रद्धेमुळे आगामी दिवसांत भाविकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news