Kolhapur Tourism | वैशिष्ट्यपूर्ण प्राचीन मंदिरांमुळे कोल्हापुरात धार्मिक पर्यटनाची पर्वणी

अंबाबाई, जोतिबासह आदमापूरचे बाळूमामा व नृसिंहवाडीचे दत्तमंदिर
ambabai temple
ambabai temple
Published on
Updated on

कोल्हापूर : अनुराधा कदम

महाराष्ट्रातील धार्मिक पर्यटनाचा केंद्रबिंदू म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची ओळख अधिक दृढ होत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले साडेतीन शक्तिपीठांपैकी एक करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर, वाडी रत्नागिरीतील जोतिबा मंदिर, नृसिंहवाडीचे दत्त मंदिर आणि आदमापूरमधील संत बाळूमामा मंदिर, आदमापूर या प्रमुख तीर्थक्षेत्रांमुळे देशभ-रातून भाविक मोठ्बा प्रमाणात येथे येतात. वर्षभर चालणारे धार्मिक उत्सव यामुळे कोल्हापूर जिल्हा श्रद्धा आणि पर्यटनाचा संगम ठरत आहे.

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक अंबाबाई मंदिर

कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेले अंबाबाई मंदिर हे देशातील प्रमुख साडेतीन शक्तियों ठांपैकी एक मानले जाते. वर्षभर येथे भाविकांची अखंड गर्दी असते. मंदिराची प्राचीन दगडी रचना, सूक्ष्म कोरीवकाम आणि हेमाडपंथी स्थापत्यशैली इतिहासाची साक्ष देतात. नवरात्रौत्सव, रथोत्सव, किरणोत्सव, अधिकमास काळात येथे भक्तीचा उत्साह शिगेला पोहोचतो. कोल्हापूर विमानतळ, रेल्वे स्टेशन तसेच राज्यभरातून येणाऱ्या बससेवेच्या माध्यमातून येथे पोहोचणे अत्यंत सोयीचे आहे.

ambabai temple
बांबवड्यात चोरींचा सुळसुळाट ; पोलीस चौकी शेजारीच ज्वेलर्स दुकाने फोडली

कोल्हापूरपासून 18 किलोमीटर अंतरावर डोंगर माध्यावर वसलेले जोतिबा मंदिर हे जोतिबाचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. कर्नाटक, आंध प्रदेशमधील भाविकांचे कुलदैवत असल्याने वर्षभर गर्दीचा ओघ असतो. मात्र चैत्र पौर्णिमा यात्रेदरम्यान मानाची सासनकाठी, दर्शनाचे खेटे, गुलाल उधळण्याची परंपरा यामुळे लाखोंची गर्दी असते. मंदिरासोबत आसपासचा निसर्गस्य परिसर पर्यटनाला चालना देतो. कोल्हापू रहून बस किंवा खासगी वाहनाने सहजपणे येथे पोहोचता येते. नृसिंहवाडीचे दत्त मंदिर कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसलेले नृसिंहवाडी है दत्तसंप्रदायातील अत्यंत पवित्र स्थान भानले आते.

श्री नरसिंह सरस्वतींचे वास्तव्य या ठिकाणी असल्याची श्रद्धा असल्यामुळे * भाविकांसाठी या क्षेत्राला विशेष महत्त्व आहे. येथे येणाऱ्या भक्तांना शांत, प्रसत्र आणि आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव मिळतो. दत्त जयंतीच्या काळात तसेच प्रत्येक गुरुवारी येथे विशेष गर्दी पाहायला मिळते. कोल्हापूरमधून बसने एका तासाचा प्रवास आहे तर जयसिंगपूर हे जवळचे रेल्वे स्थानक आहे

ambabai temple
Heatstroke on Poultry | उन्हाच्या झळांमुळे पोल्ट्री व्यवसाय संकटात: कोंबड्यांना उष्माघात, अंडी उत्पादनात घट

आदमापूर येथील बाळूमामा मंदिर

भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथे पांढऱ्याशुभ संगमरवरी दगडापासून बांधलेले धनगर समाजाचे आराध्य दैवत संत बाळूमामा मंदिर जिल्ह्यातील धार्मिक पर्यटनस्थळ आहे. मंत बाळूमामांच्या दर्शनासाठी वर्षाला लाखो भाविक येतात. विशेषतः जत्रा आणि पालखी सोहळ्यांच्या काळात येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती असते. कोल्हापूरहून रस्तेमार्गे सहज पोहोचता येणारे है ठिकाण एसटी बससेवेमुळे अधिक सुलभ झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील धार्मिक पर्यटन हे श्रद्धा, परंपरा आणि सुविधांचा सुंदर संगम ठरतो. विविध राज्यांतून येणाऱ्या भाविकांसाठी येथे सुलभ प्रवास, सुरक्षित वातावरण आणि वर्षभर चालणारे उत्सव यामुळे कोल्हापूर हे धार्मिक पर्यटनासाठी अग्रक्रमाचे ठिकाण बनत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news