Tulja Bhavani Navratri | दुर्गाष्टमीच्या निमित्ताने तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रात वैदिक होम हवन, महिषासुरमर्दिनी महापूजा

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार व त्यांच्या पत्नी सौमय्याश्री पुजार यांनी या विधीत सहभाग घेतला.
Tulja Bhavani Sharadiya Navratri
Tulja Bhavani Sharadiya NavratriPudhari
Published on: 
Updated on: 

Tulja Bhavani Sharadiya Navratri

तुळजापूर : दुर्गाष्टमीनिमित्त मंदिर परिसरातील होमकुंडावर वैदिक होम-हवन विधी पार पडला. या यज्ञ कुंडामध्ये कोहळा व नारळ यांची पूर्णाहुती देऊन होम संपन्न झाला. होमकुंडावरील वैदिक होम-हवन विधीचे यजमान जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार व त्यांच्या पत्नी सौमय्याश्री पुजार यांनी या विधीत सहभाग घेतला.

गणेश विहार येथे कोल्हापूर संस्थानच्या वतीने आयोजित होम-हवन विधीत प्रतिपचंद्र प्रयाग व मंदा प्रयाग हे यजमान म्हणून सहभागी झाले. तसेच, हैदराबादच्या रावबहादूर संस्थानच्या वतीने आयोजित होम-हवन विधीत कोंडो परिवारातील विनीत कोंडो व स्वप्नाली कोंडो यांनी यजमान म्हणून सहभाग घेतला.

Tulja Bhavani Sharadiya Navratri
Tuljapur Tulja Bhavani Temple : तुळजाभवानी मातेची शेषशायी अलंकार महापूजा

यावेळी उपविभागीय अधिकारी तथा विश्वस्त ओंकार देशमुख, तहसीलदार अरविंद बोळंगे, तहसीलदार माया माने, महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, उपाध्ये बंडू पाठक, तुळजाभवानी उपाध्ये पुजारी मंडळ अध्यक्ष अनंत कोंडो, रामचंद्र पाटील, पुजारी उपस्थित होते.

दुर्गाष्टमीनिमित्त श्री तुळजाभवानी देवीची महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. शारदीय नवरात्र महोत्सवातील दुर्गाष्टमीच्या दिवशी देवीची ही विशेष अलंकार महापूजा मांडण्याची धार्मिक परंपरा आहे.

Tulja Bhavani Sharadiya Navratri
Tulja Bhavani Temple : मटका किंगला थेट गर्भगृहात प्रवेश दिल्याप्रकरणी व्यवस्थापक निलंबित

धार्मिक आख्यायिकेनुसार, महिषासुर नामक दैत्याने देवतांचा पराभव करून स्वर्गावर ताबा मिळविला होता. त्याच्या अत्याचारांपासून मुक्तता मिळविण्यासाठी देवतांनी आदिशक्तीची प्रार्थना केली. देवतांच्या तेजातून प्रकट झालेल्या जगदंबा मातेने महिषासुराशी घनघोर युद्ध करून त्याचा वध केला आणि देवतांसह समस्त सृष्टीला त्याच्या अत्याचारांतून मुक्त केले.

देवीच्या या विजयाचे, तसेच तिच्या रौद्र, पराक्रमी आणि दुष्टांचा संहार करणाऱ्या स्वरूपाचे स्मरण म्हणून दुर्गाष्टमीच्या दिवशी महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येते. दरम्यान १८ ऑक्टोबर रोजी श्री तुळजाभवानी देवींची अश्वारूढ छबिना मिरवणूक पारंपरिक धार्मिक पद्धतीने काढण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news