धाराशिव: मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी उमरगा तालुक्यात कडकडीत बंद

उमरगा येथे कडकडीत बंद
उमरगा येथे कडकडीत बंद

उमरगा; पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उमरगा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी, (दि १४) शहर व तालुक्यात पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरासह अनेक गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंद दरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.

उमरगा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणाच्या आश्वासनाचे विशेष अधिवेशन घेऊन कायद्यात रूपांतर करावे, या मागणीसाठी व मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बुधवारी उमरगा शहर बंदची हाक दिली होती. सकाळी तालुक्यातील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यापारी बांधवांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले होते.

आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून आपल्या बंदमध्ये सहभाग नोंदवून तालुक्याच्या परंपरेनुसार शांततामय मार्गाने बंद सर्वांनी यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे अवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले होते. सकल मराठा समाजाने केलेल्या अवाहनाला प्रतिसाद देत अत्यावश्यक सेवा वगळता तालुक्यातील तुरोरी, मुळज, माडज, गुंजोटी नारंगवाडी, नाईचाकुरसह अनेक गावात बंद पाळण्यात आला. तसेच शहरातील शाळा, महाविद्यालय, हाॅटेल, संपूर्ण बाजारपेठ दिवसभर कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. उमरगा पोलिसांनी बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जागोजागी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news