Dharashiv ST Bus Accident | धावत्या एसटीचा स्प्रिंग पाटा तुटला ; चालकाच्या प्रसंगावधानाने २५ प्रवाशांचे प्राण वाचले

बस तपासणीवर प्रश्नचिन्ह?
Dharashiv ST Bus Accident | धावत्या एसटीचा स्प्रिंग पाटा तुटला ; चालकाच्या प्रसंगावधानाने २५ प्रवाशांचे प्राण वाचले
Published on
Updated on

उमरगा : उमरगा आगाराची उमरगा- मुरूम ही एसटी बस मुरूमहून उमरग्याकडे परत येत असताना कंटेकुरजवळ धावत्या बसच्या पुढील बाजूचा स्प्रिंगचा पाटा अचानक तुटल्याने मोठा अनर्थ थोडक्यात टळला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसवरील २० ते २५ प्रवाशांचे प्राण वाचले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे एसटीच्या देखभाल व नियमित तांत्रिक तपासणीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उमरगा आगाराची शनिवारी, (दि १८) एमएच ११ बीएल ९३६० क्रमांकाची बस दुपारी १ वाजता उमरगा स्थानकातून मुरूमकडे रवाना झाली होती. मुरूमहून परतीचा प्रवास सुरू असताना कंटेकुरजवळ अचानक बसच्या पुढील बाजूचा स्प्रिंगचा पाटा तुटला. त्यामुळे बसला जोराचा धक्का बसला आणि प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली.यावेळी चालक हंचाटे यांनी प्रसंगावधान राखत बसचा वेग नियंत्रणात ठेवला आणि बस सुरक्षितपणे रस्त्याच्या कडेला उभी केली.

त्यामुळे संभाव्य भीषण अपघात टळला. त्यानंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच आगार प्रमुख पी व्ही कुलकर्णी यांनी तातडीने दुसऱ्या बसची व्यवस्था करून प्रवाशांना त्यांच्या रवाना केले. मात्र, धावत्या बसचा महत्त्वाचा भाग तुटण्याची घटना गंभीर मानली जात असून, एसटी बसची नियमित तपासणी होत आहे का, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

नियमित तपासणीवर प्रश्नचिन्ह!

कंटेकुरजवळ धावत्या एसटी बसचा पाटा तुटल्याने मोठा अनर्थ टळला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचे प्राण वाचले; मात्र या घटनेने एसटी बसच्या नियमित तांत्रिक तपासणीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक फेरी पूर्वी वाहनांची काटेकोर तपासणी करून दोषी आढळल्यास तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news