उमरगा; पुढारी वृत्तसेवा: धाराशीव येथील पत्रकार, कवी व साहित्यिक रवींद्र केसकर यांच्यावरील हल्ल्याचा तालुका पत्रकाराच्या वतीने आज (दि. २) तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. Dharashiv
तहसीलदार गोविंद येरमे व पोलीस निरीक्षक डी. बी. पारेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धाराशीव जिल्हा पत्रकार संघाचे विश्वस्त रविंद्र केसकर यांचे अपहरण करत त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. सोमवारी (दि ०१) रात्री हा प्रकार घडला. Dharashiv
केसकर हे कार्यालयीन कामकाज आटोपून घरी जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अमर पॅलेस ते साळुंके नगर, बेंबळी रोड या भागात मारहाण केली. या दरम्यान चाकू हल्ल्यात त्यांच्या चेहऱ्याला जखम झाली आहे. केसकर या हल्ल्यातून बचावले असून त्यांची दुचाकी चोरून नेण्यात आली. ही दुचाकी तुळजापूर रोडवर वडगाव शिवारात टाकून देण्यात आली. मात्र, या हल्ल्याचा प्रयत्न का झाला, या मागचे सूत्रधार कोण आहेत, पत्रकारांना टार्गेट का केले जातेय, असे प्रश्न निर्माण होत आहेत.
या प्रकरणाचा तपास जलदगतीने व्हावा, यासाठी तालुक्यातील पत्रकारांच्यावतीने निवेदन देण्यात येत आले. पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याचा जाहीर निषेध करीत असून हल्लेखोरावर कडक कारवाई करण्यात यावी. पत्रकारांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या निवेदनावर पत्रकार अविनाश काळे, नारायण गोस्वामी, अंबादास जाधव, जाफर जमादार, शंकर बिराजदार, समीर सूतके, बालाजी वडजे गोळप्पा कांबळे, अमोल पाटील, प्रदीप भोसले, महादेव पाटील, सुभाष जेवळे, माधव सूर्यवंशी, तानाजी घोडके, युसूफ मुल्ला, सुमित कोथिंबरे, आकाश पोतदार, देवीसिंग राजपूत, महेबूब पठाण, विकास गायकवाड, विश्वास सोनकांबळे आदींच्या स्वाक्षरी आहेत.
हेही वाचा