Dharashiv tehsildar attack : हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा

धाराशिव : तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेची मागणी
Dharashiv tehsildar attack
हल्लेखोरांवर कठोर कारवाई कराpudhari photo
Published on
Updated on

धाराशिव : परंडा येथील तहसीलदार निलेश काकडे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, तसेच महसूलमंत्री यांना सोमवार (दि. 20 एप्रिल) रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, तहसीलदार निलेश काकडे हे बुधवार 15 एप्रिल रोजी कार्यालयीन कामकाज आटोपून खाजगी वाहनाने बाहेर पडत असताना तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर योगेश मिटकरी (रा. पिठापुरी, ता. परंडा) व अन्य एका व्यक्तीने त्यांची गाडी अडवली. यावेळी संबंधितांनी मोठ्याने आरडाओरडा करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच वाहनाच्या काचांवर जोरजोरात मारत तहसीलदारांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला.

Dharashiv tehsildar attack
Solapur news: तत्कालीन आयुक्तांवर कारवाईची मागणी

चांदणी नदीकडे जात असताना देखील संबंधितांनी गाडी अडवून शासकीय कामात अडथळा निर्माण केला आहे. ‌‘मी दिलेल्या निवेदनावर कारवाई का केली नाही?‌’ असा जाब विचारत त्यांनी हुज्जत घालत तत्काळ कारवाई न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.तहसीलदारांकडे विविध विषयांवरील निवेदने नियमित येत असतात.

संबंधित विषयानुसार ती निवेदने संबंधित विभागांकडे पाठवून त्यावर आवश्यक कार्यवाही करण्याची प्रशासकीय पद्धत आहे. मात्र, अशा प्रकारे असंविधानिक मार्गाचा अवलंब करत तालुका दंडाधिकाऱ्याला धमकावणे ही गंभीर बाब असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.

महाराष्ट्रात यापूर्वीही तालुका दंडाधिकाऱ्यांवर हल्ल्यांच्या घटना घडल्याचा दाखला देत प्रत्येक तालुका दंडाधिकाऱ्याला कायमस्वरूपी सशस्त्र पोलीस सुरक्षा उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने केली आहे.दरम्यान, परंडा तहसीलदारांवरील हल्ल्याप्रकरणी संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, अशी मागणीही करण्यात आली आहे.

Dharashiv tehsildar attack
Nashik Ashok Kharat Case | खरातच्या साथीदारांना नोकरीतून काढणार! महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा 'बडतर्फी'चा थेट इशारा

या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष तहसीलदार डॉ. मृणाल जाधव, नायब तहसीलदार उपाध्यक्ष संतोष पाटील, नायब तहसीलदार महिला प्रतिनिधी विशाखा बलकवडे, नायब तहसीलदार, सचिव सचिन पाटील नायब तहसीलदार, कोषाध्यक्ष महादेव शिंदे नायब तहसिलदार, तहसीलदार प्रकाश मेहत्रे, , रणजितसिंह कोळेकर, जयवंत पाटील, हेमंत ढोकले, निलेश काकडे, दत्तात्रय गायकवाड व नायब तहसीलदार स्वामी जी. एस. , आर. एल. बंगाळे, पूजा गोरे, प्रियंका लोखंडे, विजयकुमार बाडकर, आदींच्या सह्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news