Dharashiv News : येडशी-टेंभुर्णी चौपदरीकरणाला तीन महिन्यांत मंजुरी : ना. गडकरी

आ. पाटील, आ. राऊत यांच्या भेटीनंतर दिले आश्वासन
Dharashiv News
Dharashiv News : येडशी-टेंभुर्णी चौपदरीकरणाला तीन महिन्यांत मंजुरी : ना. गडकरीfile photo
Published on
Updated on

Dharashiv News : Yedshi-Tembhurni quadrupling approved in three months : Nitin Gadkari

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : येडशी-बार्शी-कुर्दुवाडी-टेंभुर्णी या महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठीच्या सविस्तर प्रकल्प अहवालास (डीपीआर) पुढील तीन महिन्यांत मंजुरी देण्यात येईल. त्यानंतर तातडीने निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

Dharashiv News
Dharashiv News : धाराशिव विमानतळावर मानवरहित हवाई वाहन संशोधन केंद्राबाबत चर्चा

दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आ. राणाजगजितसिंह पाटील व आ. राजाभाऊ राऊत यांनी भेट घेऊन येडशी-बार्शी-कुईवाडी-टेंभुर्णी मार्गाच्या चौपदरीकरणाबाबत सविस्तर निवेदन सादर केले. या मार्गाच्या डीपीआरला तातडीने मंजुरी देऊन प्रशासकीय मान्यता व आवश्यक निधी उपलब्ध करून कामाला लवकर प्रारंभ करावा, अशी मागणी त्यांनी केली.

धाराशिव जिल्हा मराठवाड्याचे प्रवेशद्वार असून तुळजाभवानी मंदिरामुळे धार्मिक पर्यटनाचे प्रमुख केंद्र आहे. तसेच वाढती वाहतूक, कृषी व औद्योगिक विकास लक्षात घेता टेंभुर्णी-लातूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. सध्या येडशी-लातूर टप्प्याचे काम सुरू असले, तरी टेंभुर्णी-येडशी हा उर्वरित टप्पाही तातडीने चौपदरी करण्याची मागणी करण्यात आली.

Dharashiv News
Chhatrapati Sambhajinagar ZP New Building Approval| बहुमताने जि. प. च्या नव्या इमारतीला १४ कोटी

यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-सी अंतर्गत टेंभुर्णी-कुईवाडी-बार्शी-कुसळंब तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ अंतर्गत कुसळंब-येडशी मार्गाच्या चौपदरीकरणासाठीचा डीपीआर पुढील तीन महिन्यांत मंजूर करण्यात येईल. त्यानंतर तातडीने निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही दिल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील व आमदार राजाभाऊ राऊत यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news