Dharashiv News : भूम तालुक्यात जलसाठ्यांची पातळी ५० टक्क्यांखाली

तापमान वाढीचा परिणाम; काही प्रकल्पांत जेमतेम ३ ते ७ टक्के पाणी, शेतकऱ्यांची चिंता वाढली
Dharashiv News
Dharashiv News : भूम तालुक्यात जलसाठ्यांची पातळी ५० टक्क्यांखालीfile photo
Published on: 
Updated on: 

Dharashiv News: Water storage levels in Bhum taluka fall below 50 percent

अब्बास सय्यद

भूम : तालुक्यात वाढत्या तापमानामुळे विविध पाटबंधारे प्रकल्पांतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. तालुक्यातील आठ लघुप्रकल्प, तीन मध्यम प्रकल्प आणि चार साठवण तलावांमधील पाण्याची पातळी ५० टक्क्यांखाली आली आहे. काही प्रकल्पांमध्ये तर जेमतेम तीन ते सात टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Dharashiv News
Dharashiv News : मायक्रो फायनान्सच्या मनमानी वसुलीला चाप लावा : आ. पाटील यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी

गेल्या वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे तालुक्यातील बहुतांश तलाव ओसंडून वाहत होते. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने सुरुवातीपासूनच जलसाठ्यांवर परिणाम झाला आहे. त्यात नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तापमानात वाढ झाल्याने पाण्याची पातळी आणखी घसरत आहे. १९ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या आकडेवारीनुसार, पाथरूड लघुप्रकल्पात ३.६५ टक्के, जांबमध्ये ५.९३८ टक्के, रामगंगा मध्यम प्रकल्पात ५.६० टक्के, बांगलवाडीमध्ये ७.५६२ टक्के, गोरमाळा येथे १४.२८ टक्के, उमाचिवाडी साठवण तलावात १७.३१२ टक्के, आर्सोलीत २२.४५ टक्के, बाणगंगा मध्यम प्रकल्पात ३७.२६ टक्के, कुंथलगिरीत ४१.४४ टक्के, वाकवडमध्ये ४१.८० टक्के, तर नांदगाव साठवण तलावात ४७.७१ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

सध्या मानवी पाणीपुरवठ्याची स्थिती समाधानकारक असली, तरी जलसाठ्यातील घट कायम राहिल्यास आगामी काळात पाणीटंचाईचे संकट निर्माण होऊ शकते. डिसेंबर आणि जानेवारीत थंडी टिकून राहिल्यास बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन पाणीसाठा टिकण्यास मदत होईल. मात्र, तापमानवाढ कायम राहिल्यास हिवाळ्यातही तलावांची पातळी घटण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती. यंदा मात्र कमी पावसामुळे तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे.

Dharashiv News
Dharashiv News : संविधानाच्या जागरासोबत विद्यार्थ्यांचा नशामुक्तीचा संकल्प

पाटबंधारे विभागाचे प्रकल्पांवर नियंत्रण असल्याने पाण्याचा गैरवापर टाळला जात असल्याचे सांगण्यात येते. मात्र, उपलब्ध पाणीसाठा उन्हाळ्यापर्यंत पुरणार का, असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.