

Dharashiv News: Lohara Tehsil district ranks first in the first phase of the census
लोहारा, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या 'भारताची जनगणना २०२७' अंतर्गत पहिल्या टप्प्यातील कामकाज विहित मुदतीपूर्वी आणि अचूकपणे पूर्ण करत लोहारा तहसील कार्यालयाने धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण चार्ज कार्यालयांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते तहसीलदार रणजितसिंह कोळेकर आणि त्यांच्या पथकाचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
जनगणनेसारख्या महत्त्वपूर्ण मोहिमेचे काम वेळेत आणि अचूकपणे पूर्ण करण्यासाठी तहसीलदार कोळेकर यांनी नियोजनबद्ध पद्धतीने यंत्रणेला दिशा दिली. महसूल अधिकारी, कर्मचारी, पर्यवेक्षक आणि प्रगणक यांच्यात समन्वय ठेवत कामाचा नियमित आढावा घेण्यात आला. त्यामुळे निर्धारित वेळेपूर्वी पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करणे शक्य झाले.
या मोहिमेत सर्व कर्मचाऱ्यांनी सांघिक भावनेतून योगदान दिले. प्रशासकीय नियोजन, कामातील अचूकता आणि समन्वयाच्या जोरावर लोहारा तहसील कार्यालयाने जिल्ह्यातील अन्य ग्रामीण चार्ज कार्यालयांच्या तुलनेत आघाडी घेतली. या यशाबद्दल तहसीलदार कोळेकर आणि त्यांच्या पथकाचे विविध स्तरांतून अभिनंदन होत