Dharashiv News : पिके करपली; आता सरकारविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार !

येडशीत दीड तास रास्ता रोको; हेक्टरी ५० हजार मदतीची मागणी
Dharashiv News
Dharashiv News : पिके करपली; आता सरकारविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार !file photo
Published on
Updated on

Dharashiv News: Crops ruined; farmers now launch a fierce protest against the government!

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : पावसाअभावी खरीप हंगामातील पिके करपून गेल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी येडशी येथे छत्रपती संभाजीनगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हा संयोजक संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सरकारच्या धोरणांविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र आक्रोश व्यक्त केला. मंडळ अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले. आंदोलनामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंना सुमारे तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या.

Dharashiv News
Ghatasthapana 2026 : तुळजाभवानी मंदिरात यंदा ११ ऑक्टोबरला होणार घटस्थापना

जिल्ह्यात सरासरीपेक्षा ४० टक्क्यांहून कमी पाऊस झाल्याने सोयाबीन, मका, उडीद, मूग, ऊस, पालेभाज्या व फळभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपयांची तातडीची मदत द्यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.

नियमित पीककर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांचे अनुदान, कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना लाभ, जनावरांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था आणि पीक विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम देण्याची मागणीही करण्यात आली.

Dharashiv News
Dharashiv Crime | पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार, संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

खरीप पिकांचे ८५ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असताना प्रशासनाने ५० टक्के नुकसानीचा अहवाल पाठविल्याचा आरोप आंदोलकांनी केला. हा अहवाल रद्द करून शास्त्रज्ञांच्या संयुक्त अहवालानुसार नुकसान नोंदवावे, अशी मागणी करण्यात आली. परतीच्या पावसासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याची प्रक्रिया राबवावी, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी संजय पाटील दुधगावकर, दयानंद पाटील, सुरेश नाईकनवरे, इकबाल पटेल, औदुंबर धोंगडे, बब्रुवान वाकुरे, सतीश माने, दिनेश खुणे, संदीप जाधव, सचिन शेळके यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news