Dharashiv Crime | पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार, संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

कळंब तालुक्‍यातील शिराढोण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटनेने खळबळ
  Girl Assaut
Girl AssautPudhari
Published on
Updated on

Kalamb Minor Assault Case

धाराशिव : कळंब तालुक्‍यातील शिराढोण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात पाच वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारास संशयिताने बालिकेला आपल्या घराच्या गच्चीवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार तिच्या आईने केली. या तक्रारीवरून शिराढोण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच पॉक्सोअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास शिराढोण पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news