Dharashiv News : भूमच्या १५ नगरसेवकांनी केले उपोषण

गैरव्यवहार, अनियमित कारभाराची केली तक्रार; देयके थांबवून चौकशीची मागणी
Dharashiv News
Dharashiv News : भूमच्या १५ नगरसेवकांनी केले उपोषणfile photo
Published on
Updated on

Dharashiv News: 15 Councilors from Bhum Stage Hunger Strike

भूम, पुढारी वृत्तसेवा : पालिकेतील कथित अनियमितता, भ्रष्टाचार आणि मनमानी कारभाराच्या निषेधार्थ जनशक्ती शहर विकास आघाडीच्या १५ नगरसेवकांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.

यापूर्वी १७ एप्रिल रोजी नगरसेवकांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा नगर प्रशासन अधिकाऱ्यांकडे विविध गंभीर मुद्द्यांवर सविस्तर निवेदन सादर केले होते. मात्र, त्या निवेदनाची अद्याप दखल न घेतल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Dharashiv News
Parbhani government strike : राज्यव्यापी संपात 17 हजारांवर कर्मचाऱ्यांचा एल्गार

नगरसेवकांनी दिलेल्या निवेदनानुसार मार्च २०२१ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत घनकचरा व्यवस्थापन कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित देयके तत्काळ थांबवून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

आहे. तसेच प्रभारी मुख्याधिकारी प्रवीण जाधव यांनी दलितेतर वस्ती सुधार योजना (२०२४-२५) व महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागर ोत्थान योजनेंतर्गत सर्वसाधारण सभेचा ठराव न घेता प्रशासकीय मान्यता दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ही कामे रद्द करून नव्याने सभेच्या ठरावाद्वारे मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजना २०२२-२३ अंतर्गत कसबा क्रीडांगण विकास कामामध्ये मुदत संपल्यानंतरही नियमबाह्य देयके अदा करण्यात आल्याचा आरोप करत संबंधित तत्कालीन मुख्याधिकारी, नगर अभियंता व लेखापाल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागर-ोत्थान योजनेंतर्गत सुमारे ११४ कोटी रुपयांच्या सिमेंट रस्ते कामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, चौकशीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Dharashiv News
‌Jalna construction workers protest : ’लाल बावटा‌’चे जिल्हा कचेरीसमोर निदर्शने

प्रशासनाने तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आज सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनात उपनगराध्यक्ष लक्ष्मी साठे, गटनेते रुपेश शेंडगे, बांधकाम सभापती अनिल शेंडगे, नवनाथ रोकडे, रामराजे कुंभार, आबासाहेब मस्कर, चंद्रमणी गायकवाड, विठ्ठल बागडे, यशवंतभय्या थोरात, शमशाद हरून मुजावर, शीतल अमोल गाडे, चंद्रकला हरिचंद्र पवार, सुनिता गणेश वीर, नूरजहाँ महंमद इसार मणियार व सुरेखा दत्तात्रय काळे हे नगरसेवक सहभागी झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news