OmRaje Nimbalkar | 'आता आम्ही कोणता दादा निवडावा'?: ओमराजेंच्या शिंदे शिवसेना प्रवेशाने शिवसैनिकांची कोंडी

काही शिवसैनिकांचे फिक्स, तर काहीजण तळ्यात मळ्यात
Omraje Nimbalkar
Omraje Nimbalkarfile photo
Published on
Updated on

Omprakash Raje Nimbalkar Join Shinde Shiv Sena

परमेश्वर पालकर

कळंब : धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनी ठाकरे सेनेची मशाल विझवत शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेऊन महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडून आणला. खासदार निंबाळकर हे यापूर्वी कळंब- धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. त्यामुळे त्यांना मानणारा वर्ग कळंब तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आहे.

तसेच त्यांचे वडील कै. पवनराजे निंबाळकर हे तेरणा कारखान्याचे चेअरमन होते. त्यामुळे कळंब तालुक्यात निंबाळकर घराण्याचे मोठ्या प्रमाणावर वर्चस्व आहे. परंतु गेली दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये विद्यमान आमदार कैलास घाडगे पाटील यांना शिवसेनेत प्रवेश देऊन निंबाळकर यांनी आपले वजन या तालुक्यात कायम ठेवले होते. निंबाळकर यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यामुळे त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर शिवसेनेत प्रवेश करण्याच्या विचारात आहे.

Omraje Nimbalkar
Omraje Nimbalkar News : समर्थक खुश; मात्र सामान्य जनतेच्या भावनांचे काय ?

परंतु, परंतु गेली दहा वर्ष खासदार निंबाळकर व आमदार पाटील यांची जोडी या मतदार संघात मोठ्या प्रमाणावर फेमस झालेली होती. त्यामुळे आमदार पाटील यांच्या मितभाषी स्वभावामुळे त्यांनीही अनेक कार्यकर्ते आपलेसे केलेले आहेत. तसेच दोघांनी मिळून कार्यकर्त्यावर केलेल्या प्रेमामुळे काही कार्यकर्ते बुचकुळ्यात पडले आहेत. आता आम्ही कोणता दादा निवडावा, असा प्रश्न या कार्यकर्त्यांसमोर उभा टाकला आहे.

त्यामुळे काही कार्यकर्ते हे द्विधा मनस्थितीत असून कोणत्या दादाचा झेंडा हाती घ्यायचा याचा विचार करत आहेत. येणाऱ्या काळात कोणते कार्यकर्ते कोणत्या दादाकडे जाणार यावरूनच त्या कार्यकर्त्यांचे प्रेम लक्षात येणार आहे. त्यामुळे तालुक्यातील जनता या कार्यकर्त्यांच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहे.

Omraje Nimbalkar
Omraje Nimbalkar Joins Shinde Sena : शिंदे सेनेत दाखल होताच ओमराजेंचा अमित शहांशी संपर्क

सावंत समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण

या अगोदर पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुका पासून कळंब तालुक्यात शिवसेनेमध्ये दोन गट पडले होते. यामध्ये अजित पिंगळे यांना मानणारा वर्ग व सावंत यांना मानणारा वर्ग हे थेट एकमेकांच्या विरोधामध्ये काम करत होते. त्यामुळे दोघेही एकमेकांना पाण्यात बघण्यासाठी कुठलीही कसर सोडत नव्हते.

आणि पिंगळे यांनी कळंब धाराशिव मतदार संघात आपले वजन पक्षश्रेष्ठीकडे मजबूत ठेवले होते. त्यामुळे साहजिकच सावंत यांच्या समर्थकांवर अन्याय होत होता. परंतु, निंबाळकरांचा झालेला प्रवेश आणि मंगळवारी आलेल्या कार्यकारणी बरखास्ततिचा आदेश सावंत समर्थकांना मोठ्या आनंदाचे पर्व वाटत आहे. त्यामुळे या बरखास्तीच्या निर्णयाचे सावंत समर्थक मोठ्या प्रमाणावर समर्थन करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात पिंगळे समर्थकांना नेमका काय न्याय मिळणार हे येणाऱ्या काळातच दिसून येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news