Crop Insurance Dharashiv | खरीप २०२० पीकविमा प्रकरणात धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा; २२७ कोटींची पीकविमा रक्कम वितरित करण्याचे आदेश

ज्ञानराज चौगुले यांच्या न्यायालयीन लढ्याला यश; धाराशिवमधील ३.५७ लाख सोयाबीन उत्पादकांना लाभ
Kharif 2020 Crop Insurance
Kharif 2020 Crop InsurancePudhari
Published on: 
Updated on: 

Kharif 2020 Crop Insurance

उमरगा : खरीप २०२० च्या पीकविमा प्रकरणात शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केलेल्या न्यायालयीन लढ्याला अखेर यश आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढलेल्या या प्रकरणात धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २२७ कोटी रुपयांची पीकविमा रक्कम वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

खरीप २०२० मध्ये अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र, २४ तासांच्या आत नुकसानीची पूर्वसूचना दिली नसल्याचा तांत्रिक मुद्दा पुढे करून बजाज अलायन्झ पीक विमा कंपनीने अनेक शेतकऱ्यांचे विमा दावे नाकारले होते. त्यामुळे शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहिले.

Kharif 2020 Crop Insurance
Dharashiv News : भूम, परंडा शिवारात भीषण आग; २ कोटींचा ऊस जळून खाक !

या अन्यायाविरोधात शेतकरी नेते अनिल जगताप यांनी आवाज उठवून प्रकरण तत्कालीन आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी चौगुले यांच्या नावाने छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर विमा कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

मात्र, चौगुले यांनी हा लढा थांबवला नाही. सातत्याने न्यायालयीन पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले.

अखेर न्यायालयीन प्रक्रियेतून शेतकऱ्यांच्या बाजूने दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील तब्बल ३ लाख ५७ हजार २८२ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रति हेक्टर जवळपास नऊ हजार रुपये या प्रमाणात पीकविमा रक्कम येत्या आठवडाभरात जमा होणार असल्याची माहिती चौगुले यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.