

Dharashiv crime news
धाराशिव : पत्नी ज्या दुकानात कामाला जाते; त्या दुकान मालकासोबत तिचे अनैतिक संबंध जुळल्याने हतबल झालेल्या पतीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी सदर व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार पत्नीसह तिच्या मित्रावर गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील आळणी येथे मंगळवारी (दि. २९) सकाळी तानाजी नानासाहेब भराडे (वय ४०) यांनी झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले. मृत तानाजी भराडे यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार, तानाजी यांच्या पत्नीचे आणि बालाजी घाडगे (रा. धाराशिव) यांच्यात अनैतिक संबंध होते. यामुळे मानसिक त्रासाला कंटाळून तानाजी यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
तानाजी भराडे यांचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.