

वाशी : तालुक्यात गुरुवार ( दि १४ )रोजी सांयकाळी सात वाजल्यापासून पाऊसाला सुरुवात झाली. रात्री दहा वाजेच्या सुमारास पाऊसाने जोर धरल्याने तालुक्यात सर्वत्र. ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. एक तासाच्या आतच आनेक गावच्या नद्याला पुर आला तर सर्वत्र पाणीच पाणी झाले.
मांडवा ते दसमेगाव रोडवर पुलाचे काम चालु आहे तात्पुरता साईडरोड व पुल बनवलेला होता तो पुल व रोड या पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्या मुळे दोन्ही गावचा संपर्क तुटला आहे तसेच नदीकाटच्या शेतकऱ्याच्या पिकात पुराचे पाणी शिरले त्या मुळे ऊस, सोयाबीन, मका आदी पिके या पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत.
तसेच याच नदीपात्रावर घोडकी साठवण तलाव आहे तलाव ओहरफुल झाला त्या मुळे साठवण तलावा जवळील पुल व रोड पुरात वाहून गेला आहे . या मुळे घोडकी व पिंपळगाव (लीं) गावचा संपर्क तुटला आहे . धाराशीव जिल्हाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी वाशी तालुक्यात येऊन वाशी, सरमंकुडी, आदी ठिकाणी व घोडकी गावाजवळील पुल व रोड पुरात वाहून गेला याची पाहणी केली. या वेळी शिवसेना (उबाठा ) गटाचे तालुका प्रमुख - तात्यासाहेब गायकवाड, युवासेना तालुका प्रमुख - गणेश भराटे, तहसिलदार -प्रकाश म्हेत्रे , मंडळ अधिकारी - उंदरे , सार्वजनिक बांधकाम विभागचे -कुरकवाड जी . ए , तलाठी - निलेश काळे आदी उपस्थित होते. पुराच्या पाण्यात शेतकऱ्याचे पिके वाहून गेली आहेत . त्याचा पंचनामा करुण नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.