Dharashiv News : जिजामाता कृषी भूषण पुरस्काराने धाराशिवच्या लेकीचा गौरव

हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनाच्या औचित्याने मुंबई येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये आयोजित राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात हा गौरव झाला.
Dharashiv News
Dharashiv News : जिजामाता कृषी भूषण पुरस्काराने धाराशिवच्या लेकीचा गौरवfile photo
Published on
Updated on

Daughter of Dharashiv Honoured with Jijamata Krishi Bhushan Award

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील फनेपूर येथील प्रतिभा रामराव काळे यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल 'जिजामाता कृषी भूषण पुरस्कार' प्रदान करून गौरविण्यात आले.

Dharashiv News
Dr. Sharad Gore: साहित्यिक बिळात जाऊन बसले; समाजाच्या दुर्दशेला साहित्यिकही जबाबदार, डॉ. शरद गोरे यांची साहित्यिकांवर थेट टीका

हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनाच्या औचित्याने मुंबई येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये आयोजित राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात हा गौरव झाला. हा पुरस्कार राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

Dharashiv News
Kolhapur News : सन्मान, प्रेरणा अन्‌‍ कौतुकभरल्या वातावरणात महिला दिन साजरा

धाराशिवच्या लेकीने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर मिळविलेला हा राज्यस्तरीय सन्मान संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली असून, कृषी क्षेत्रात कार्यरत महिला शेतकऱ्यांसाठी तो प्रेरणादायी ठरणार आहे. विशेष म्हणजे, पुरस्कारप्राप्त प्रतिभा काळे या भाजपचे मराठवाडा संयोजक नितीन काळे यांच्या मातोश्री आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news