Illegal Water Extraction : अनधिकृत पाणी उपसा रोखला; तीन मोटारी जप्त

वांगी-जवळा तलाव परिसरात कारवाई
Illegal Water Extraction
वांगी-जवळा तलावातील अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी प्रशासनाने संयुक्त कारवाई केली.pudhari photo
Published on: 
Updated on: 

भूम : भूम तालुक्यातील वांगी-जवळा तलावातील पिण्याच्या पाण्याचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने सोमवारी (दि. १९ ऑक्टोबर) संयुक्त कारवाई केली. महसूल, पाटबंधारे, महावितरण आणि पोलीस विभागाच्या पथकाने अनधिकृत पाणी उपसा रोखताना तीन मोटारी आणि पाइपलाइन जप्त केली. तसेच विद्युत पुरवठाही बंद करण्यात आला.

वांगी-जवळा तलावावर वांगी खुर्द, भूम आणि जवळा या गावांच्या पाणीपुरवठा योजना कार्यरत आहेत. त्यामुळे तलावातील पाणी संबंधित गावांच्या पिण्यासाठी सुरक्षित राखणे आवश्यक आहे. मात्र, यापूर्वी समज देऊनही तलावातून पाणी उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाने ही कारवाई केली. महसूल, पाटबंधारे, महावितरण आणि पोलीस विभागाच्या भरारी पथकाने तलाव परिसरात तपासणी केली.

Illegal Water Extraction
Environmental Awareness in Schools : मातीच्या माठातून झाडांना जीवनदान; मळशी तांडा शाळेचा पर्यावरणपूरक प्रयोग!

या वेळी पाणी उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या तीन मोटारी आणि पाइपलाइन जप्त करण्यात आली. अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी संबंधित विद्युत पुरवठाही खंडित करण्यात आला. तलावातील उपलब्ध पाण्यावर संबंधित गावांच्या पाणीपुरवठा योजनांची भिस्त असल्याने त्याचा अनधिकृत वापर रोखण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. वारंवार सूचना देऊनही पाणी उपसा सुरू असल्याने प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली.

या मोहिमेमुळे पिण्याच्या पाण्याच्या साठ्याचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे. भविष्यातही अनधिकृत पाणी उपशावर प्रशासनाकडून लक्ष ठेवले जाणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Illegal Water Extraction
Sharad Purnima 2026: शरद पौर्णिमेला गुपचूप करा या ५ गोष्टींचे दान; घरात कधीच भासणार नाही पैशांची चणचण!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news