Tuljapur News : अश्विन पौर्णिमा उत्सवाची आज सांगता

देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना; मानाच्या काठ्यांसह छबिना मिरवणूक
Tuljapur News
Tuljapur News : अश्विन पौर्णिमा उत्सवाची आज सांगताfile photo
Published on: 
Updated on: 

Ashwin Purnima festival end today

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : तुळजाभवानी देवीच्या अश्विन पौर्णिमा उत्सवाची सोमवारी (दि. २६) सांगता होणार आहे. पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना झाल्यानंतर पंचामृत अभिषेक पूजा आणि सकाळी सहा वाजता नित्योपचार अभिषेक पूजेला प्रारंभ होईल. लाखो भाविक यासाठी दाखल झाले आहेत.

Tuljapur News
Dharashiv Crime : परंडा तालुक्‍यात गोवा बनावटीच्‍या दारूचा साठा जप्‍त

दुपारी सोलापूरच्या शिवलाड तेली समाजाच्या मानाच्या काठ्यांचे तुळजापुरात आगमन होणार असून, रात्री उशिरा छबिना मिरवणूक काढण्यात येईल. महंतांच्या जोगव्यानंतर उत्सवाची सांगता होईल. नवरात्र महोत्सवाचा दुसरा टप्पा २५ ते २७ ऑक्टोबरदरम्यान साजरा होत आहे.

Tuljapur News
Tuljapur News : कोजागरीनिमित्त तुळजापुरात लाखो भाविकांची गर्दी

सीमोल्लंघन सोहळ्यानंतर देवी नगरच्या पलंगावर श्रमनिद्रेसाठी विसावली होती. अश्विन पौर्णिमेनिमित्त सोमवारी पहाटे देवी पुन्हा सिंहासनावर विराजमान होणार असून, धार्मिक विधींनंतर मानाच्या काठ्यांचे आगमन आणि छबिना मिरवणूक हे उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news