Yedeshwari Devi : येरमाळ्यात देवीच्या दर्शनासाठी भक्तांचा महापूर

येडेश्वरी देवी यात्रेला उत्साहात प्रारंभ; आज चुना वेचण्याचा मुख्य विधी
Dharashiv Yedeshwari Devi Yatra
येरमाळ्यात देवीच्या दर्शनासाठी भक्तांचा महापूरfile photo
Published on
Updated on

A flood of devotees flocked to Yermala to have darshan of the goddess

येरमाळा, पुढारी वृत्तसेवा : श्री येडेश्वरी देवी यांच्या चैत्र पौर्णिमा यात्रेला गुरुवारपासून (दि.२) उत्साहात प्रारंभ झाला. देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येरमाळा नगरीत दाखल झाले आहेत. आई राजा उदो उदो...! या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला असून संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे. शुक्रवारी (दि. ३) सकाळी १० वाजता होणाऱ्या चुना वेचण्याच्या मुख्य विधीमुळे भाविकांची गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Dharashiv Yedeshwari Devi Yatra
Dharur Jagdamba Devi Yatra : सोनिमोह्यात जगदंबा देवीची यात्रा

चैत्र पौर्णिमेनिमित्त देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली असून मिळेल त्या वाहनाने भाविक येत आहेत. शिव-ारात, रस्त्याकडेला व झाडाखाली भाविकांनी राहुट्या उभारून मुक्कामाची तयारी केली आहे. रब्बी हंगामातील नवीन धान्याचा नैवेद्य देण्याची परंपरा पाळली जात असून संबळ, झांज, ढोलकीच्या तालावर आराधी गीतांनी वातावरण भक्तिमय झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news