तुळजापूर : चैत्र यात्रेच्या निमित्ताने भाविकांची गर्दी; पावसामुळे भाविकांना दिलासा | पुढारी

तुळजापूर : चैत्र यात्रेच्या निमित्ताने भाविकांची गर्दी; पावसामुळे भाविकांना दिलासा

तुळजापूर; पुढारी वृत्तसेवा : चैत्र महिन्यात भरणारी तुळजाभवानी देवीची चैत्री यात्रा सुरू झाली आहे. यात्रेनिमत्त पुढील आठ दिवस तुळजापुरात दररोज शेकडे भाविकांची गर्दी होणार आहे. तसेच यात्रेतील तुळजाभवानी देवीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे.

चैत्री पौर्णिमेच्या निमित्ताने प्रतिवर्षी भरणारी परंपरागत चैत्री यात्रेस सुरुवात झाली आहे. यात्रेसाठी भाविकांचा तुळजापुरात येत आहेत. या निमित्ताने कर्नाटक-महाराष्ट्रसह विविध राज्यातून भाविकांची गर्दी देवीच्या दर्शनासाठी होत असते.

दरम्यान अवकाळी पाऊस सुरू असल्यामुळे भाविकांना उन्हाच्या त्रासापासून दिलासा मिळाला आहे. याशिवाय मेन रोड व कमानवेज भागात व्यापाऱ्यांनी आपापल्या दुकानासमोर पडदा लावून उन्हापासून संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. या काळात भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तुळजाभवानी मंदिर परिसर आणि कमांडवेस आर्य चौक, भवानी रोड येथे भाविकांना मोफत पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी भाविकांमधून करण्यात येत आहे.

आपापल्या भागामधून वाजत गाजत भाविकांचे जत्ते देवीच्या दर्शनासाठी येत आहे. हलगी वाजवत आणि भगवी पताका खांद्यावर घेऊन ही भाविकांची गर्दी शहरात येत आहे. तुळजाभवानी देवीचा जयघोष करत ही गर्दी मंदिरात जाते आहे. या निमित्ताने शहरातील बाजारपेठेमध्ये भाविकांची गर्दी आहे.

हेही वाचा :

Back to top button