धाराशिव : डॉ. कांबळे राष्ट्रवादीतून शिवसेनेत; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन | पुढारी

धाराशिव : डॉ. कांबळे राष्ट्रवादीतून शिवसेनेत; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन

कळंब, परमेश्वर पालकर : उमरगा तालुक्यातील मुळ रहिवासी व शहरातील मोहेकर कॉलेजचे प्रा. डॉ. संजय कांबळे यांनी राष्ट्रवादीची तुतारी सोडून उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत मशाल हाती धरली आहे. शुक्रवारी कळंब शहरात शिवसेना ठाकरे गटाच्या जनसंवाद सभेत डॉ. कांबळे यांनी पक्षप्रवेश केला. याचा फटका उमरगा तालुक्यातील शिंदे गटाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांना बसणार का? हे येणाऱ्या काळात दिसून येईल.

प्रा. डॉ. संजय कांबळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष होते. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून काम पाहत आहेत. ते धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक म्हणून कार्यरत आहेत. मराठवाड्यातील दलीत व बहुजन चळवळीत त्यांच अग्रगण्य नाव आहे. त्यांनी उमरगा विधानसभा डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेत प्रवेश केला असल्याची चर्चा आहे. त्यांना पक्षाने संधी दिली तर खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा लढविण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले.

पक्षप्रवेशावेळी खासदार संजय राऊत, सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, माजी आमदार दयानंद गायकवाड, तालुकाप्रमुख शिवाजी कापसे आदी उपस्थित होते.

डॉ. कांबळे यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाधयक्ष मोहम्मद चाऊस, डिकसळ तंटामुक्तीचे अध्यक्ष हनुमंत जाधव, शहर उपाध्यक्ष उत्रेश्वर घोडके, सुब्राव जाधव, अरूण मुंडे, अर्जुन वाघमारे, इक्बाल शेख, साजिद शेख, कमलाकर बंडगर, रमेश पवार, अशोक राठोड यांनी पक्षप्रवेश केला. यामुळे शिवसेनेला मराठवाड्यात चळवळीतील मोठा चेहरा मिळाला असुन पक्ष त्यांना काय न्याय देतो यावर पुढचे राजकीय गणितं अवलंबून असतील.

हेही वाचा : 

Back to top button