धाराशिव : ‘तुळजाभवानी मंदिर संस्थान’च्या वेबसाईटची फसवणूक, गुन्हा दाखल | पुढारी

धाराशिव : 'तुळजाभवानी मंदिर संस्थान'च्या वेबसाईटची फसवणूक, गुन्हा दाखल

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : ‘‘तुळजाभवानी मंदिर संस्थान’च्या वेबसाईटची फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थानच्या वेबसाईटशी साधारण असणाऱ्या वेबसाईटद्वारे फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी तुळजापूर येथील विजय सुनील बोदले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे तुळजापुरात खळबळ उडाली आहे.

 आरोपी विजय सुनिल बोदले,( रा. शुक्रवार पेठ तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव)  याने तुळजाभवानी मंदिर प्रशानाची कसलीही परवानी न घेता  नावाशी साधर्म्य असणारे एचटीटीपी:// उत्सव ॲपडाटइन/क्रिया/मा-तुलजा-भवानी-टेम्पल ऑनलाईन- पुजा या नावाचे संगणकीय सांधनांचा वापर करुन फसवणूक केली. त्यावरती भाविंकामार्फत वेगवेगळ्या पुजा करण्यासाठी भाविकांकडून पैसे घेवून भाविकांची व मंदीर संस्थानाची फसवणुक केली, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी तुळजाभवानी मंदिर संस्थान मध्ये कार्यरत असणारे इलेक्ट्रिक इंजिनियर अनिल बापुराव चव्हाण, ( वय 57 वर्षे ) यांनी 14 डिसेंबर 2023 रोजी याबाबत फिर्याद दाखल केली. यानंतर आरोपी विजय सुनील बोदले याच्या विरोधात कलम 417, 419, 420, भा.दं.वि.सं. सह कलम 66(सी), 66(डी) आय. टी. ॲक्ट अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button