परभणी : महावितरणचे कनेक्शन तुटल्याने शहरवासीय काळोखात; नागरिकांमध्ये गैरसमज

परभणी : महावितरणचे कनेक्शन तुटल्याने शहरवासीय काळोखात; नागरिकांमध्ये गैरसमज
Published on
Updated on

गंगाखेड; पुढारी वृत्तसेवा : शहरातील उपजिल्हा रुग्णालय परिसरातील महावितरणच्या मुख्य तारेचा संपर्क तुटल्याने गुरुवारची रात्र व पहाट असे शहरवासीयांचे सुमारे १२ तास काळोखात गेले. दरम्यान ऐन किचकट या ठिकाणी मुख्य तारेचे कनेक्शन तुटल्याने शहरवासीयांच्या नाहक त्रास सहन करावा लागला. ही समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी अधिकाऱ्यांना फोन केले असता, अधिकाऱ्यांचे फोन बंद आले अशा अनेक अडचणी आल्या. हे सत्र गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असून, अधिकाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या समज- गैरसमजांना अधिकाऱ्यांना मोठे तोंड द्यावे लागत आहे.

मागील काही दिवसांत सर्वसामान्य नागरिकांच्या महावितरण सेवेबद्दल तक्रारींचा पाढा वाढतच आहे. अधिकारी मोबाईल स्विच ऑफ करून बसतात असा मोठा गैरसमाज नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. तर दुसऱ्या बाजूने अधिकाऱ्यांना महावितरणकडून देण्यात आलेले मोबाईल क्रमांक हे ओडाफोन कंपनीचे असल्याने, वोडाफोनचे नेटवर्क मागील काही महिन्यांपासून विस्कळीत झाल्याने अधिकाऱ्यांना नागरिकांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. महावितरणच्या जिल्हा अधिकाऱ्यापासून ते तालुका अधिकाऱ्यापर्यंत हीच मोठी मनस्ताप होणारी बाब अधिकारी व नागरिकांत गैरसमज वाढवून देण्यास कारणीभूत ठरत असल्याचे दिसत आहे.

असाच एक कडू अनुभव बुधवारी रात्री अकरा वाजल्यापासून ते गुरुवारी सकाळी 11 वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित झाल्याने शहरवासीयांना आला. शहरातील उपजिल्हा रुग्णालयात शेजारील विद्युत प्रवाहाच्या मुख्य कार्याचे कनेक्शन तुटल्याने संपूर्ण शहर रात्रभर म्हणजे सुमारे 12 तास अंधारात होते. अशाप्रसंगी अनेकांनी महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र डिस्कनेक्टिव्हिटीमुळे संपर्क होऊ न शकल्याने नागरिकांचा महावितरण अधिकाऱ्यांवरील रोष वाढला. या संपूर्ण प्रकाराची माहिती महावितरणचे नितेश भसारकर यांचेकडून पुढारीने घेतली असता, अभियंता भुसारकर यांनी आपल्या वोडाफोन संपर्क क्रमांकाची व्यथाच मांडली.

 नागरिकांनी थेट कार्यालयात येऊन संपर्क साधावा

शहर तसेच परिसरातील नागरिकांना विद्युत सेवेबद्दल कुठलीही अडचण असल्यास, त्यांनी थेट कार्यालयात येऊन आपली समस्या मांडावी. प्रशासनाच्या वतीने तत्काळ नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतल्या जाईल. परंतु केवळ मोबाईल बंद असल्याने गैरसमज करून न घेता नागरिकांचे प्रश्न, अडीअडचणी सोडविण्यासाठी महावितरणला सहकार्य करावे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news