ZP Election : रांजणगाव, दौलताबाद, करमाड, वाळूज एससीसाठी राखीव

जिल्ह्यात गट, गणांचे अनुसूचित जाती-जमाती आरक्षण निश्चित
ZP Election
ZP Election : रांजणगाव, दौलताबाद, करमाड, वाळूज एससीसाठी राखीव File Photo
Published on
Updated on

Zilla Parishad and Panchayat Samiti election process accelerated

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रक्रियेला वेग आला असून, याच पार्श्वभूमीवर लोकसंख्येच्या आधारावर गट व गणांच्या अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षण प्रस्तावास विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी बुधवारी (दि.८) मंजुरी दिली आहे. शहरालगत महत्त्वाचे मानले जाणारे व मागील वेळी इतर प्रवर्गासाठी आरक्षित असलेले रांजणगाव, दौलताबाद, करमाड, वाळूज हे गट यावेळी एससीसाठी राखीव झाले आहेत.

ZP Election
Water Bill News : एमआयडीसीने दिला वाळूजकरांना वाढीव पाणी बिलाचा शॉक

जिल्ह्यातील एकूण ६३ गटांपैकी ८ गट अनुसूचित जातीसाठी, तर ३ गट अनुसूचित जमातीसाठी राखीव ठरले आहेत. तर पंचायत समितीच्या १२६ गणांपैकी १७ गण अनुसूचित जातीसाठी, तर ५ गण अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. लोकसंख्येच्या आधारे तयार करण्यात आलेला आरक्षणाचा आराखडा विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. या आराखड्याला बुधवारी अंतिम मंजुरी मिळाली. यानंतर उर्वरित आरक्षण १३ ऑक्टोबर रोजी निश्चित होणार आहे. २०११ मध्ये जिल्ह्याची लोकसंख्या २२ लाख १० हजार १६५ इतकी होती.

ZP Election
Sambhajinagar News : गोरक्षकावरील जीवघेणा हल्ल्याने तणाव; संघटनांनी तासभर रोखला जालना रोड

ती लोकसंख्या गृहीत धरून त्या आधारे २०१७ मध्ये झालेल्या जि. प. व पं. स. निवडणुकीसाठी गट, गण रचना करण्यात आली होती. त्याआधारे विचार केला तर सरासरी ४० हजार लोकसंख्येचा गट, तर २० हजार लोकसंख्येचा एक गण करण्यात आला आहे. १४ ते १८ गावांचा एक गट त्यावेळी होता. आता ही संख्या बदलली आहे. वाढलेल्या लोकसंख्येसह नव्याने गट, गण रचना केलेली आहे.

इच्छुकांचे स्वप्न धुळीस

शहरालगत असलेले महत्त्वाचे गट आता एससीसाठी राखीव झाल्यामुळे मागील अनेक वर्षांपासून जि.प. निवडणुकीच्या तयारीत असलेल्या अनेक इच्छुकांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. त्यांना राजकीय पटलावर नव्याने आखणी करण्याची वेळ आली आहे.

अनुसूचित जातीसाठी राखीव गट :

रांजणगाव शे.पुं., सावंगी, पिंपळगाव पिंप्री, वाळूज बु., दौलताबाद, करमाड, अंबेलोहळ, पंढरपूर

अनुसूचित जमातीसाठी राखीव गट : गोदेगाव, उंडणगाव आणि जेहूर.

अनुसूचित जातीसाठी राखीव पंचायत समिती गण : आमखेडा, पानवडोद बु., पालोद, औराळा, वाणेगाव, वेरूळ, सवंदगाव, महालगाव, रांजणगाव शे.पुं., जोगेश्वरी, सावंगी, मुधलवाडी, चितेगाव आणि पाचोड बु.

अनुसूचित जमातीसाठी राखीव पंचायत समिती गण : गोदेगाव, हळदा, हट्टी, जेहूर, वाकला आणि तुर्काबाद.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news